भारताचा क्रिकेटपटू, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी खिलाडु वृत्तीसाठी ओळखला जातो. अतिशय खडतर परिस्थितीतून आल्यामुळे धोनीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांना कधीही निराश करत नाही, अशी त्याची ख्याती आहे. आपल्या चाहत्यांना भेटून त्यांना आनंद देण्याचा धोनी नेहमीच प्रयत्न करत असतो. पण सध्या एका चाहत्यामुळे धोनी ट्रोल होत आहे. धोनीच्या रांची येथील फार्महाऊसबाहेर त्याला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्याकडे ढुंकूनही न पाहिल्यामुळे धोनीवर टीका होत आहे. हा चाहता दिल्लीहून १२०० किमतींचे अंतर सायकलवर कापून रांची येथे आला होता. धोनीच्या घराबाहेर त्याने आठवडाभर तंबू ठोकून मुक्कामही केला. पण धोनी फार्महाऊसमधून बाहेर पडताना त्याने चाहत्याकडे पाहिलेही नाही.

View this post on Instagram

A post shared by Gᴀuʀᴀv Kumar (@epic_g7)

three people have died after helicopter crashed in Punes Bavdhan
पुण्याहून मुंबईकडे निघालेले हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू, याआधीही मुळशीत हेलिकॉप्टर कोसळलं होतं…
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Israel Iran war
Israel Iran War: “इराणनं आमच्यावर हल्ला करून मोठी चूक केली, आता त्यांना…”, इस्रायलनं दिला थेट इशारा
Jitendra Awhad Shivneri Bus
Jitendra Awhad : “भरत गोगावलेंचे पाय धरून नमस्कार केला पाहिजे”, ‘शिवनेरी सुंदरी’च्या निर्णयावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

या चाहत्याचे नाव गौरव कुमार आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर प्रवासापासून धोनीच्या घराबाहेर कॅम्पिंग करेपर्यंतचे सर्व अपडेट पोस्टद्वारे दिले आहेत.

गौरव कुमारने इन्स्टावर प्रत्येक दिवसाची एक पोस्ट केली आहे. एका पोस्टमध्ये त्याने म्हटले की, आज पाच दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही माही सर मला भेटलेले नाहीत. पण गौरव कुमारच्या त्यागाबाबत कदाचित महेंद्रसिंह धोनीपर्यंत माहिती पोहोचलेली नाही. त्यामुळेच जेव्हा तो फार्महाऊसच्या बाहेर आला, तेव्हा धोनीने गौरव कुमारकडे पाहिलेही नाही.

यानंतर आता धोनीवर अनेकांनी टीका केली आहे. एका युजरने म्हटले की, यांना हिरो बोलणे बंद करा.

आणखी एका युजरने म्हटले की, धोनी धोनी करणाऱ्यांनी आता धोनीचा खरा चेहराही पाहून घ्यावा. हा बिचारा गौरव १२०० किमी सायकल चालवून दिल्लीहून रांचीला आला. पण चार दिवसांपासून धोनीने त्याला भेटण्यासाठी वेळ दिला नाही. अशा अहंकारी माणसाचा चाहता व्हायचेच कशाला. हे लोक पीआर वापरून स्वतःची प्रतिमा चमकावत असतात.

धोनी आपल्या गाडीतून बाहेर येतानाचाही व्हिडीओ एक व्हिडीओ गौरवने इन्स्टावर टाकला आहे.

या व्हिडीओत गौरव धोनीला हात दाखविताना दिसत आहे. मात्र धोनी गाडी न थांबविता निघून जातो. दरम्यान, याआधी धोनीने अनेकदा आपल्या चाहत्यांबरोबर फोटो, सेल्फी काढताना दिसून येतो. मात्र गौरव कुमारला भेट दिली नसल्यामुळे आता धोनीला टीकेला सामोरे जावे लागत आहे.