Rohit Sharma accused tampering with photos : टीम इंडियाच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मावर मोठा आरोप करण्यात आला आहे. फोटोशी छेडछाड केल्याचा हा आरोप आहे. मात्र, हे आरोप कितपत खरे आहेत याची पुष्टी करू शकत नाही. पण, रोहित शर्माने फोटोशी छेडछाड केल्याबद्दल सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसत आहेत. टीम इंडियाने श्रीलंकेत टी-२० मालिका जिंकली असताना रोहितवर फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणि, रोहितने मालिका जिंकल्याबद्दल सूर्यकुमार यादव आणि कंपनीचे अभिनंदन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या फोटोवरून रोहितवर आरोप?

जर तुम्हाला वाटत असेल की भारताच्या विजयाच्या फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप रोहितवर करण्यात आला आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. ज्या फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर आहे तो फोटो त्याचाच आहे. फोटोबाबत, रोहितवर छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याने स्वतः शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये रोहितचे पोट दिसत नाही. मात्र, बीसीसीआयने शेअर केलेल्या याच फोटोत त्याचे पोट हलके दिसत आहे. त्यामुळे चाहते म्हणत आहेत की रोहितने स्वत:ला सडपातळ दाखवण्यासाठी फोटोशी छेडछाड केली आहे. त्याचबरोबर त्याने तो फोटो डिलीट केला आहे, असे चाहत्यांचे म्हणने आहे.

रोहित शर्माने केले टीम इंडियाचे अभिनंदन –

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून अभिनंदन केले आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘परफेक्ट स्टार्ट वेल डन टीम.’ मात्र, आता रोहित शर्मासमोर सूर्यकुमार यादवची विजयी घोडदौड सुरू ठेवण्याचे आव्हान आहे. श्रीलंकेत वनडे मालिका जिंकण्याचे आव्हान आहे. त्यामुळे अशा आरोपांकडे दुर्लक्ष करून, तो पूर्णपणे तयार असल्याचे दिसते.

हेही वाचा – Manu Bhaker Won 2nd Bronze: मनूचे ऐतिहासिक दुसरे कांस्यपदक; सरबज्योतसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात यश

भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :

पहिला एकदिवसीय सामना, २ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
दुसरा एकदिवसीय सामना, ४ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
तिसरा एकदिवसीय सामना, ७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता, कोलंबो

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fans allege that rohit sharma has editing his photos to make himself look slim vbm