पाकिस्तान सुपर लीग २०२३ चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते पीएसएलमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचा आरोप करत आहेत. शादाब खानने पीएसएलमध्ये बाबर आझमची विकेट फिक्स केल्याचे बोलले जात आहे.

हा व्हिडिओ पीएसएल २०२३ च्या पहिल्या एलिमिनेटरचा आहे, ज्यात इस्लामाबाद युनायटेडने गुरुवारी रात्री पेशावर झाल्मीचा सामना केला. शादाबाद खान इस्लामाबाद युनायटेडचा कर्णधार आहे, तर बाबर आझम पेशावर झाल्मीचे नेतृत्व करत आहे.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
bashar assad palace Video
Bashar Assad Palace Video : रोल्स रॉइस, फरारी अन्… असाद यांच्या राजवाड्यात घुसलेल्या सीरियन बंडखोरांना काय सापडलं? Video आला समोर
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?

व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल सांगायचे तर, १२वे षटक सुरू होण्यापूर्वीच, शादाब खान स्टंपवर बेल ठेवताना अंपायरला सांगत आहे की ‘या षटकामध्ये बाबर आऊट आहे.’ त्याचा हा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शादाब खानने बाबर आझमला विकेटसमोर पायचीत केले. तेव्हा अंपायरने पेशावर झाल्मीच्या कर्णधाराला पायचीत बाद दिले. आश्‍चर्य म्हणजे बाबर आझम यांनी यासाठी रिव्ह्यू सुद्धा घेतला नाही. त्यामुळे चाहत्यांचा संशय बळावत असून ते फिक्सिंग झाल्याचा आरोप करत आहे.

चाहते सामना स्पॉट फिक्सिंग झाल्याचा आरोप करत आहेत.


इस्लामाबाद युनायटेडचा पराभव करून पेशावर एलिमिनेटर २ मध्ये दाखल-

पाकिस्तान सुपर लीगच्या गुरुवारी रात्री झालेल्या पहिल्या एलिमिनेटर सामन्यात पेशावर झाल्मीने इस्लामाबाद युनायटेडचा १२ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विजयाच्या जोरावर एलिमिनेटर २ मध्ये प्रवेश केला. पहिल्या एलिमिनेटरबद्दल बोलायचे तर बाबर आझमच्या अर्धशतकाच्या जोरावर पेशावरने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावा ठोकल्या.

हेही वाचा – NZ vs SL 2nd Test: विल्यमसन-निकोल्स जोडीने न्यूझीलंडसाठी रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील १८वी जोडी

या धावसंख्येचा पाठलाग करताना इस्लामाबाद संघाला निर्धारित २० षटकांत केवळ १७१ धावाच करता आल्या. अॅलेक्स हेल्स (५७) आणि शान मसूद (६०) यांनी इस्लामाबादसाठी दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली, पण आमेर जमालने तीन षटकांत दोन्ही फलंदाजांना बाद करून पेशावरला सामन्यात पुनरागमन करुन दिले. आमेर जमालने या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि एक धावबादही केले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Story img Loader