भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला. यावेळी प्रथमच दोन खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे समावेश आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा सरफराज खानकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे चाहते बीसीसीआय आणि निवड समितीवर टीका करत आहे.
सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोन्ही खेळाडूंचा अलीकडचा फॉर्म चांगला राहिला आहे. ऋषभ पंत दुखापतीमुळे बराच काळ बाहेर आहे. त्यामुळे किशनचा केएस भरतचा बॅकअप म्हणून समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंतशिवाय जसप्रीत बुमराहचीही दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटींसाठी निवड झालेली नाही.
त्याचबरोबर आशिया चषक स्पर्धेत संघाबाहेर असलेला रवींद्र जडेजाही संघात परतला आहे. त्याची निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असली, तरी जडेजा व्यतिरिक्त फिरकी विभागात रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.
सरफराज खानची निवड न झाल्याने चाहते नाराज –
युवा खेळाडू सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. तरी देखील त्याची भारतीय कसोटी संघात निवड न झाल्याने चाहते संतापले आहेत. चाहत्यांचे म्हणने आहे की, सूर्यकुमार यादल आणि इशान किशनच्या जागी सरफराजला संधी मिळायला हवी होती. रणजी ट्रॉफीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे चाहते प्रचंड नाराज आहेत.
एका चाहत्यांने लिहले, सरफराज खानची संघात निवड होण्यासाठी आता काय करावे लागेल?
दुसरा चाहता म्हणाला, भारतीय संघातील खेळाडूंची निवड आवडी-निवडीच्या आधारे केली जाते.
तिसरा चाहता म्हणाला, इशान किशन किंवा सूर्यकुमार यादव यांच्याऐवजी सरफराज खान कसोटी संघात असायला हवा होता. गेल्या काही वर्षांपासून तो खूप चांगली कामगिरी करत आहे. त्याचा अलीकडचा फॉर्मही चांगलाच आहे.
हेही वाचा – IND vs SL: ‘कुलदीप यादवला केकेआरच्या बसमध्येही बसू दिले जात नव्हते’, माजी खेळाडूचा मोठा खुलासा
चौथा चाहता म्हणाला, सूर्यकुमार यादव आणि इशानला निवडण्यात काही अर्थ नाही. अभिमन्यू ईश्वरन, प्रियांक पांचाळ आणि सरफराज खान सातत्याने धावा करत आहेत. पण निवड समितीला फक्त एकदिवसीय आणि टी-२० खेळाडू हवे असल्याने त्यांची कधीही निवड होणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मज शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.