Farhan Ahmed England Spinner Take 10 Wickets: सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळले जात आहे. ज्यामध्ये १६ वर्षीय खेळाडूचा मोठा पराक्रम पाहायला मिळाला आहे. १६ वर्षीय फिरकीपटू फरहान अहमदने इंग्लंडसाठी काऊंटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. फरहानने सरेविरुद्धच्या दोन्ही डावांत नॉटिंगहॅमशायरकडून एकूण १० विकेट घेतले. यासह फरहान प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका सामन्यात १० विकेट्स घेणारा जगातील सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे. त्याच्या दमदार कामगिरीनंतरही नॉटिंगहॅमशायर आणि सरे यांच्यातील सामना अनिर्णित राहिला.

हेही वाचा – Yograj Singh on Kapil Dev: “मी कपिल देवला सांगितलेलं, तुझी अशी अवस्था करेन…”, युवराजचे वडिल योगराज सिंगांचं धक्कादायक वक्तव्य

१५९ वर्षे जुना विक्रम

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज फरहान अहमद काऊंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायरकडून खेळत आहे. या सामन्यात फरहानने सरेविरुद्ध १० विकेट घेतल्या होत्या. त्यापैकी पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या होत्या. यासह फरहानने ग्रेसचा १५९ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. १८६५ साली जेंटलमेन ऑफ द साउथकडून खेळताना ग्रेसने सामन्यात ८४ धावांत १३ विकेट घेतल्या होत्या. त्यावेळी ग्रेस यांचे वय १६ वर्षे ३४० दिवस होते. आता फहरानने १६ वर्षे १९१ दिवस वय असताना ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा – Yograj Singh: “धोनीमुळे युवराजने लवकर निवृत्ती घेतली…”, वडिल योगराज सिंग यांचा गौप्यस्फोट

फरहान अहमद हा रेहान अहमदचा भाऊ

फरहान अहमद हा इंग्लंड क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रेहान अहमदचा भाऊ आहे. विरोधी फलंदाज फरहानच्या फिरकीच्या जाळ्यात चांगलेच अडकले. सामन्याबद्दल बोलायचे तर सरेने प्रथम फलंदाजी करताना ५२५ धावा केल्या होत्या. सरेकडून साई सुदर्शन आणि रॉरी बर्न्स यांनी शतके झळकावली होती.

सरेविरुद्धच्या या सामन्यात फरहानने पहिल्या डावात ७ विकेट घेतले होते. दुसऱ्या डावात त्याच्या खात्यात ३ विकेट्स जमा झाल्या. सामन्याबद्दल बोलायचे तर सरे संघाने मैथमध्ये प्रथम फलंदाजी करत ५२५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात नॉटिंगहॅमशायरने ४०५ धावा केल्या आणि सरेला १२० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात सरेने १७७ धावा केल्यानंतर डाव घोषित करून नॉटिंगहॅमशायरला विजयासाठी २९८ धावांचे लक्ष्य दिले. त्यानंतर नॉटिंगहॅमशायर संघाने शेवटच्या दिवशी एकही विकेट गमावली नाही.

हेही वाचा – Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने सलग दुसरे पदक जिंकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली महिला भारतीय खेळाडू

इंग्लंडकडून अंडर-19 विश्वचषक खेळला आहे रेहान अहमद

फरहान अहमद १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतही इंग्लंडकडून खेळला आहे आणि या वर्षी त्याला प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. फरहानने आतापर्यंत एकूण दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण १३ विकेट घेतल्या आहेत, तर लिस्ट ए मध्ये, फरहानच्या खात्यात फक्त एक विकेट आहे. गोलंदाजीसोबतच फरहान खालच्या फळीत चांगली फलंदाजी करू शकतो.