रवींद्र जडेजाशी झालेल्या बाचाबाचीप्रकरणी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रयत्न करत असले तरी अँडरसनला चार सामन्यांच्या बंदीची शिक्षा होणार नाही. मी हे प्रकरण काही मिनिटांत सोडवू शकतो, असे भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनीअर यांनी सांगितले.
‘‘या प्रकरणाची तपशीलवार माहिती माझ्याकडे नाही. पण अँडरसनवर बंदीची शिक्षा व्हावी, असे बीसीसीआयलाही वाटत नसावे. ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना अँडरसनने जडेजाला ढकलल्याचे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पाहिले. अँडरसन थोडासा खोडकर असला तरी त्याला चार सामन्यांच्या बंदीची शिक्षा होऊ शकणार नाही. हे प्रकरण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असल्यामुळे मी सामनाधिकारी डेव्हिड बून आणि आयसीसीला दोष देईन. जर मी सामनाधिकारी असतो तर मी अँडरसन आणि जडेजाला दोघांनाही माझ्या खोलीत बोलावून विचारणा केली असती. जर अँडरसन दोषी असता तर मी त्याला जडेजाची माफी मागायला लावली असती. त्याने तसे केले नसते तर हे प्रकरण गंभीर बनले असते. पण मी हे प्रकरण पाच मिनिटांत सोडवू शकलो असतो,’’ असे आयसीसीचे माजी सामनाधिकारी असलेल्या इंजिनीअर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा