Farooqui dismissing Shadab with Mankadig in the last over: मांकडिंग हा क्रिकेटचा असा एक पैलू आहे, ज्याच्याद्वारे जेव्हा जेव्हा फलंदाजाला आऊट करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा चर्चेला उधाण येते. क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीने मांकडिंगला योग्य ठरवले असले, तरी ‘स्पिरिट ऑफ द गेम’ ही बाब नेहमीच चर्चेत राहिली आहे. गुरुवारी हंबनटोटा येथे खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात असेच दृश्य समोर आले.या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक विकेटने पराभव केला. मात्र, या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाज अफगाणिस्तानच्या फलंदाजाला मांकडिंगने आऊट करताना दिसत आहे.

फारुकीने शेवटच्या षटकात शादाबला केले आऊट –

त्याचं झालं असं की, ३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकण्यासाठी धडपडत होता. ४७व्या षटकात इफ्तिखार अहमद बाद झाल्यानंतर अडचणी आणखीनच वाढल्या. आता पाकिस्तानसाठी चेंडू आणि धावांमधील अंतर वाढत होते, पण आठव्या क्रमांकावर उतरलेला शादाब खान हार मानण्याच्या मनस्थितीत नव्हता. ४९व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार मारून त्याने हे अंतर कमी केले. त्यामुळे शेवटच्या षटकांत पाकिस्तानला विजयासाठी ११ धावांची गरज होती.

विलंब न करता उडवल्या बेल्स –

हा सामना शादाब जिकवून देईल, असे वाटत होते. तो थोडी घाई करताना दिसत होता. दरम्यान, अफगाणिस्तानचा गोलंदाज फजलहक फारुकी शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा त्याला शदाब क्रीज सोडताना दिसला. ते पाहून फारुकीला मांकडिंग धावबाद करण्याची संधी मिळाली. शादाब बाहेर येताच त्याने विलंब न करता लगेच बेल्स उडवल्या. त्यामुळे शादाब खानला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. याचा आता व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – PAK vs AFG: मोहम्मद नबी आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंवर बाबर आझम संतापल्याचा VIDEO व्हायरल

थर्ड अंपायरने दिले आऊट –

थर्ड अंपायरने रिव्ह्यू पाहिल्यावर शदाब नॉन स्ट्रायकर एंडच्या क्रीझच्या पुढे असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत त्याला बाद घोषित करण्यात आले. यानंतर अफगाणिस्तानचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण नसीम शाहने हरिस रौफच्या साथीने पाकिस्तानला एक विकेटने दणदणीत विजय मिळवून दिला. पाकिस्तानने भलेही हा सामना जिंकला असेल, पण ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ तेजस्वी फलंदाज शादाब मांकडिंग केल्यानंतर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. एकीकडे चाहते फझलहक फारुकी बरोबर असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा खेळ भावनेची ​​चर्चा सुरू झाली आहे.

Story img Loader