चेन्नई : क्रिकेट ही आपली आवड आहे. खेळाच्या कारकीर्दीचा एक भाग आहे. पण, क्रिकेट म्हणजेच सर्व काही नाही याची जाणीव धोनीला यापूर्वीच झाली होती, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘क्रिकेट हे सर्व काही नसते, हे खेळाडूला समजणे खूप आवश्यक आहे. धोनीला ते खूप आधीच समजले. खेळत असतानाच मैदानाबाहेर आल्यावर क्रिकेटमधून बाहेर पडणे महत्त्वाचे असते. ते प्रत्येकालाच जमते असे नाही. जेव्हा क्रिकेटपटू निवृत्त होतो, तेव्हा त्याच्याकडे आयुष्य जगण्याचे पर्याय उपलब्ध असायला हवेत. निवृत्तीनंतर अनेक खेळाडूंना संघर्ष करताना पाहिले आहे. कारण, त्यांनी आयुष्यात फक्त खेळासाठी सर्वस्व दिले, पण खेळ सोडल्यावर त्यांच्याजवळ काहीच उरले नव्हते,’’असे झहीर म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast bowler zaheer khan expressed about cricket and dhoni sport news amy