गेल्या ७७ वर्षांत विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारा पहिला ब्रिटिश टेनिसपटू ठरलेल्या अँडी मरेला या वर्षीचा ‘बीसीसी’चा सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्काराने गौरवण्यात आले. जुलै महिन्यात झालेल्या स्पर्धेत मरेने नोव्हाक जोकोव्हिचवर मात करून विम्बल्डनचे जेतेपद पटकावले होते. अँडी मरेला कॅमेऱ्याची प्रतिकृती असलेला विशेष चषक देऊन सन्मानित करण्यात आले. वेल्स आणि लायन्स संघाचा रग्बीपटू लाय हाल्फपेनी याने उपविजेतेपद पटकावले. मरेने दोन वेळा जागतिक जेतेपद पटकावणारा धावपटू मो फराह, टूर डी फ्रान्स शर्यतीचा विजेता ख्रिस फ्रूम आणि अमेरिकन गोल्फ स्पर्धेतील विजेता जस्टिन रोस यांना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला.

Story img Loader