टी२० विश्वचषक २०२२ मध्ये मिळालेली निराशा मागे टाकत भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. येत्या शुक्रवारी तीन सामन्यांच्या टी२० मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे होणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी राहुल द्रविडच्या जागी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने मोठे वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय प्रशिक्षक म्हणाले, “माझ्या मते टी२० क्रिकेटमध्ये मोठे फटके खेळण्यास अधिक स्वातंत्र्य असते आणि फलंदाजांनी विचारांच्या स्पष्टता ठेवूनच खेळले पाहिजे. मी या खेळाडूंसोबत खूप वेळ घालवला आहे आणि त्यांना अप्रतिम आंतरराष्ट्रीय खेळाडू बनताना देखील पाहिले आहे, मला वाटते की हीच त्यांची ताकद आहे.

मालिकेचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की, “टी२० फॉरमॅटमध्ये तुम्हाला निर्भयपणे आणि मोकळेपणाने खेळण्याची गरज आहे. पण त्याचवेळी तुम्ही परिस्थितीचे आकलन करून संघाच्या गरजेनुसार तुमचा खेळ ठरवणेही महत्त्वाचे आहे. मला वाटतं लवचिक असणं खूप महत्त्वाचं आहे पण टी२० क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वत:ला व्यक्त करण्याची गरज आहे आणि मग तुम्हाला तिथे यश मिळेल.” लक्ष्मण पुढे म्हणाला, “मला वाटते टी२० क्रिकेटमध्ये स्पष्ट विचार ठेवून खुलेपणाने खेळण्याची खूप गरज आहे. मी या खेळाडूंसोबत जितका वेळ घालवला आहे, तितकाच मी त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये सामील होताना पाहिले आहे.

द्रविडसोबतच रोहित-कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह, नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. एवढेच नाही तर केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी या बड्या खेळाडूंनाही न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात स्थान मिळालेले नाही. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या टी२० आणि शिखर धवन एकदिवसीयमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.

हेही वाचा :   एमएस धोनी नंतर हा खेळाडू होऊ शकतो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार, वसीम जाफरने केले मोठे विधान

भारतीय संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप सिंह, हरदीप सिंह,. हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fearless but flexible keep conditions in mind vvs laxman ahead of first t20i against nz avw