एकेकाळी टेनिसमधील अनभिषिक्त सम्राट अशी बिरुदावली मिरवणाऱ्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररसमोर राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे यांसारख्या दिग्गज प्रतिस्पध्र्याचे आव्हान निर्माण झाल्यानंतर फेडररला ग्रँड स्लॅम जेतेपदांसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे ग्रँड स्लॅम स्पर्धामधील कामगिरी सुधारण्यासाठी आता फेडरर २०१४ मोसमाच्या सुरुवातीला ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे. ‘‘ब्रिस्बेनमध्ये खेळावे, ही माझी आधीपासूनच इच्छा होती. ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी मी या स्पर्धेत खेळणार नाही, तर ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मी उतरणार आहे,’’ असे फेडररने सांगितले.

Story img Loader