न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना जांघेतील दुखापतीमुळे खेळू न शकलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हेरनॉन फिलँडर पूर्णपणे तंदुरुस्त ठरला असून पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फिलँडरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता, पण या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्याला त्याला मुकावे लागले होते. पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना १ फेब्रुवारीपासून येथील वॉण्डरस स्टेडियमवर होणार आहे.
संघ : ग्रॅमी स्मिथ (कर्णधार), हशिम अमला, अब्राहम डी‘व्हिलियर्स, फॅफ डय़ू प्लेसिस, डीन इल्गार, जॅक कॅलिस, रॉरी क्लेंव्हेल्ड, मॉर्ने मॉर्केल, अलव्हिरो पीटरसन, रॉबिन पीटरसन, व्हेरनॉन फिलँडर, जॅक्सेव रुडॉल्फ आणि डेल स्टेन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा