भारतात २०१७मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या त्रिसदस्य समितीने येथील सॉल्ट लेक स्टेडियमची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. ‘फिफा’च्या पथकाचे प्रमुख इनाकी अल्वारेझ म्हणाले, ‘‘सॉल्ट लेक स्टेडियम अतिशय भव्य आहे. प्रेक्षकांनी भरलेल्या या स्टेडियमवर सामना खेळताना खेळाडूंनाही खूप आनंद होईल. भारतामधील अनेक स्टेडियम्सची आम्ही पाहणी केली आहे. सर्वच स्टेडियमवरील सुविधा चांगल्या आहेत. आता आम्ही लवकरच आमचा अहवाल फिफाकडे पाठवू व त्यांच्याकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.’’
या स्टेडियमवरील कृत्रिम गवत काढून त्याच्याऐवजी नैसर्गिक गवताचे मैदान करण्याबाबत तुम्हाला काय वाटते, असे विचारले असता अल्वारेझ म्हणाले, ‘‘हा निर्णय तांत्रिक समितीच्या अधिकारात येतो. मी त्यामध्ये तज्ज्ञ नाही. या स्टेडियमवरील खुच्र्या, खेळाडूंच्या खोल्या, पंचांचा विश्रांती कक्ष आदीमध्ये अत्यानुधिक सुविधांची आवश्यकता आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा