१८ वर्षांखालील खेळाडूंच्या खरेदी-विक्री संदर्भात नियमांचा भंग केल्याप्रकरणी फिफाने बार्सिलोना क्लबला दोषी ठरवले होते. दोषी आढळल्यामुळे १४ महिन्यांच्या बंदीची शिक्षा ओढवून घेतलेल्या बार्सिलोना क्लबने फिफाकडे अपील केले होते. मात्र फिफाने हे अपील फेटाळून लावले आहे.
अपील फेटाळले गेल्याने बार्सिलोनाला खेळाडूंच्या खरेदी विक्रीच्या पुढच्या दोन सत्रात सहभागी होता येणार नाही. फिफाच्या निर्णयामुळे जानेवारी २०१६ पर्यंत बार्सिलोनाला आपल्या ताफ्यात नवीन खेळाडूंना सामील करून घेता येणार नाही. ४९३, ६३७ डॉलर्स दंडाच्या शिक्षेविरोधातील बार्सिलोनाचे अपीलही फिफाने फेटाळले आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फिफाने बार्सिलोना क्लबला ९० दिवसांची मुदत दिली आहे.
बार्सिलोना आता आपली बाजू स्वतंत्र क्रीडा लवादाकडे मांडणार आहे.
गेल्या काही वर्षांंमध्ये बार्सिलोनाच्या यशात ला मेसिआ या अकादमीचे योगदान महत्त्वाचे आहे. फिफाच्या निर्णयामुळे १८ वर्षांखालील खेळाडूंना घडवणाऱ्या अकादमीचे कार्यक्षेत्रच धोक्यात आले आहे. यंदाच्या हंगामात बार्सिलोनाने ल्युइस सुआरेझ आणि थॉमस व्हर्माइलेन या दोन खेळाडूंना प्रचंड रक्कम अदा करून संघात सामील करून घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा