रिओमध्ये उसळलेल्या दंगलीचा फिफा विश्वचषकाच्या आयोजनाला कोणताही धोका नाही, असे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) महासचिव जेरोम वाल्के यांनी स्पष्ट केले.
कोपाकाबाना समुद्राजवळून मंगळवारी निघालेल्या एका रॅलीदरम्यान संतप्त निदर्शक तसेच स्थानिक रहिवासी आणि पोलिसांमध्ये खडाजंगी उडाली. या दरम्यान एक नर्तकी मृतावस्थेत आढळून आली. तिला पोलिसांनीच ठार मारले, असे आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यानंतर या रॅलीचे रुपांतर दंगलीत झाले. ‘‘फारच दुर्दैवी अशी घटना होती. पण त्यामुळे फिफा विश्वचषकाला धोका नाही. ब्राझीलमध्ये युद्धाला सुरुवात झाली का, अशी विचारणा करणारे अनेक संदेश मला आले. मी नाही, म्हणून उत्तर दिले,’’ असे वाल्के म्हणाले.

Story img Loader