फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनचे (फिफा) अध्यक्ष सेप ब्लाटर हे न्यूझीलंडला सुरू असलेल्या २० वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेची अंतिम लढत पाहण्यासाठी जाणार नसल्याची माहिती फिफाने मंगळवारी दिली. ‘‘झुरिचमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ‘फिफा’ अध्यक्ष न्यूझीलंडला विश्वचषक स्पध्रेच्या अंतिम लढतीसाठी उपस्थित राहू शकत नाही,’’ अशी माहिती ‘फिफा’च्या प्रवक्त्यांनी दिली. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनी ग्रस्त झालेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाशी (फिफा) असलेले संबंध अनेक संस्थांनी तोडण्यास सुरुवात केली आहे. नोबेल शांती केंद्राने फिफाबरोबर फारकत घेण्याचे ठरविले आहे.