‘फिफा’चे क्रीडा मंत्रालयाला स्पष्ट आदेश; खेळासाठी पैसे खर्च करण्याचा सल्ला
भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या १७ वर्षांखालील वयोगटाची फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकारने चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठीच ६ ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या लढतीपूर्वी भव्यदिव्य असा उद्घाटनीय सोहळा करण्याची लगबग सुरू होती, परंतु आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) त्यांच्या आनंदावर विरजण घातले आहे. उद्घाटन सोहळ्यासाठीची रक्कम सामन्यावर खर्च करण्याचा सल्ला फिफाकडून शुक्रवारी देण्यात आला.
फिफाने जगभरात आयोजित केलेल्या स्पर्धापूर्वी उद्घाटन सोहळ्याची प्रथा पाळली नाही आणि भारतातही तोच नियम लागू होता. फिफा आणि स्थानिक आयोजन समितीनेही तसे स्पष्टपणे सांगितले होते, परंतु क्रीडा मंत्रालयाकडून उद्घाटन सोहळ्यासाठी हटवादी भूमिका घेण्यात आली.
५ ऑक्टोबरला किंवा ६ ऑक्टोबरला पहिला सामना खेळवण्याच्या तासभर आधी हा सोहळा आयोजित करण्यासाठी क्रीडा मंत्रालय खटाटोप करत होते. याबाबत फिफाची भूमिका विचारली असता फिफाचे स्पर्धाप्रमुख जैमी यार्झा यांनी अशा संकल्पना मान्य करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.
‘‘१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फिफा आणि स्थानिक आयोजन समिती भारत सरकारसह काम करीत आहे. या दरम्यान क्रीडा मंत्र्यांनी उद्घाटन सोहळ्याचा आग्रह धरला होता. मात्र यापूर्वीच्या स्पर्धाप्रमाणे आणि खेळाच्या विकासाच्या दृष्टीने फुटबॉल आणि खेळाडू यांवरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यासाठी केला जाणारा खर्च येथील युवा खेळाडूंच्या आणि देशातील फुटबॉल विकासासाठी वापरावा,’’ असे स्पष्ट मत यार्झा यांनी व्यक्त केले.