पुढील महिन्यात होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत काही निदर्शकांनी निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे फिफा विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी ब्राझीलमधील जनता विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाविरोधात रस्त्यावर उतरली होती. त्याचा फटका स्टेडियमच्या नूतनीकरणाला बसला. याबाबत फिफाचे महासचिव जेरोम वाल्के म्हणाले की, ‘‘ब्राझीलला सामाजिक समस्या भेडसावत असल्या तरी विश्वचषक स्पर्धेदरम्यान निदर्शक पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहेच. ब्राझीलमधील आरोग्य आणि शिक्षणाबाबतच्या सोयीसुविधा सुधारण्यापेक्षा स्टेडियम्सच्या बांधणीसाठी केलेला ११ दशलक्ष डॉलरचा खर्च वाया गेला, हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. फिफा विश्वचषकाच्या आयोजनामुळे देशातील गुंतवणूक अनेक पटीने वाढते. एखादा संघ फिफा विश्वचषकाच्या आयोजनासाठी बोली लावत असेल तर त्या देशातील सोयीसुविधा सुधारणे, हाच त्यामागचा हेतू असतो.’’