गोव्यातील लोकांना काजूच्या वेगवेगळय़ा पदार्थाचे जसे आकर्षण असते, तितकेच हे लोक फुटबॉलवर मनापासून प्रेम करतात. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावरील आंतरक्लब स्पर्धामध्ये गोव्याचे चार संघ सतत चर्चेत असतात. या ठिकाणीही कुमार विश्वचषक स्पर्धेबाबत कमालीचे औत्सुक्य आहे. या स्पर्धेतील काही सामने फाटरेडा स्टेडियमवर होणार आहेत. आकारमानाने गोवा हे छोटे राज्य असले तरी चर्चिल ब्रदर्स, साळगांवकर स्पोर्ट्स क्लब, गोवा स्पोर्टिग क्लब, डेम्पो क्लब या चार संघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडविले आहेत. या स्टेडियमवर क्रिकेटचे काही आंतरराष्ट्रीय सामने झाले असले तरीही फुटबॉल हा येथील लोकांचा श्वास आहे. जेव्हा विश्वचषक स्पर्धेचे संयोजनपद भारताला मिळाले, तेव्हा या स्पर्धेतील काही सामने येथे होणार ही काळय़ा दगडावरची रेघ होती. या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता जेमतेम २० हजार असली तरीही येथे येणाऱ्या फुटबॉलचाहत्यांना येथील रमणीय निसर्गसौंदर्याचाही आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
काजूइतकेच फुटबॉलवर प्रेम करणारे गोवेकर
या स्टेडियमवर क्रिकेटचे काही आंतरराष्ट्रीय सामने झाले असले तरीही फुटबॉल हा येथील लोकांचा श्वास आहे.
Written by मिलिंद ढमढेरे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-09-2017 at 03:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa u 17 world cup football in goa football ground in goa