अनेकांचे अंदाज चुकीचे ठरवत इंग्लंडच्या संघाने युवा विश्वचषक आपल्या खिशात घातला आणि ज्यांच्याबद्दल अपेक्षा होत्या त्या संघांना रिकाम्या हाताने घरी परत जावं लागलं..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा आहे ती फास्टर फेणे अर्थात ‘फाफे’ची.. एका हत्येच्या प्रकरणाचा मागोवा घेणारा नायक आणि समोर येणाऱ्या अडचणींवर मात करत एक एक गुंता सोडवण्यासाठीचा त्याचा आटापिटा, हे सर्व प्रेक्षकांना सुरुवातीपासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारे आहे. असे फार कमी पाहायला मिळते. चित्रपट सुरू होताच मध्यंतरापर्यंत त्या पुढील कथेचा अंदाज प्रेक्षकांना आलेला असतो किंवा तो जाणून घेण्याची उत्सुकता नाहीशी झालेली असते. पण, ‘फाफे’ने प्रेक्षकांची नस अचूक ओळखली. मराठीतील या रहस्यपटाच्या प्रयोगाने सर्वाना आपलेसे केले आहे. आता हा फेणे विक्रम प्रस्थापित करेल की नाही ते येणारा काळच सांगेल. मात्र, गेल्या महिन्याभरात मदानावर रंगलेल्या ‘फाफु’ने अनेक विक्रम मोडले. या ‘फाफु’ला भारतातील क्रीडा रसिकांनी भरभरून प्रेम दिले. ‘फाफु’ म्हणजे काय, तर फास्टर फुटबॉल!

क्रिकेटवेडय़ा भारतात आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) पहिल्यांदाच स्पर्धा घेण्याचे धाडस दाखवले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतलेली मेहनतही सार्थ झाली. पण त्याही पलीकडे फुटबॉल या फास्टर (जलद) खेळाने भारतीयांवर केलेली मोहिनी अधिक महत्त्वाची आहे. फुटबॉल विश्वचषक आणि भारतात, असा काहीसा सुरुवातीचा सूर, पण स्पध्रेअंती त्या आश्चर्यकारक सुरांत अभिमानाचा आलाप आला. कुमार विश्वचषक स्पध्रेच्या या १७ व्या हंगामाने प्रेक्षक उपस्थितीचे आणि गोल्सचे सारे विक्रम मोडले. त्यापलीकडे या स्पध्रेने भारतीयांमध्ये आशा जागृत केली. आपणही जगातल्या सर्वोत्तम संघाना तोडीस तोड उत्तर देऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजन करण्याची क्षमता आपल्यातही आहे. हा विश्वास या स्पर्धा आयोजनातून आला.

एखाद्या चित्रपटात घडणाऱ्या रंजक घटना या स्पध्रेतही अनुभवायला मिळाल्या. स्पेन, ब्राझील, माली, घाना या जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांना मागे टाकून इंग्लंडने विश्वचषक आपल्या कवेत कधी घेतला हे कळलेच नाही. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पध्रेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची लक्षवेधी कामगिरी, मणिपूरच्या जिक्सन सिंगचा तो ऐतिहासिक गोल, इराणच्या अनपेक्षित भरारी, रियान ब्रेवस्टरची उल्लेखनीय कामगिरी, धीरज सिंग आणि सी. अ‍ॅँडरसनचा अभेद्य बचाव, जपानच्या खेळाडूंची झुंज.. असे अनेक प्रसंग या ‘फाफु’ च्या माध्यामातून भारतातील फुटबॉलप्रेमींनी अनुभवले. यातील सर्वोत्तम प्रसंग कोणता असं त्यांना विचारलं तर ते जिक्सनने हेडरद्वारे केलेला गोल असं सांगतील. जिक्सनचा तो गोल प्रत्यक्ष पाहणाऱ्या आणि त्यानंतरचा माहोल अनुभवणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर त्यावेळी शहारे आले होते. आपण स्वत: मदानावर होतो आणि तो गोल आपणच केला असा तो आनंद होता. पण पुढच्या क्षणी जे घडलं ते स्तब्ध करणारं होतं. आनंदाची लाट ज्या वेगाने आली त्याच वेगाने ती गेलीही. पण भारताच्या त्या ऐतिहासिक गोलचा क्षण डोळ्यांत साठवून प्रत्येक जण अभिमानाने घरी गेला. भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येईल याची खात्री सगळ्यांना होती. पण भारतीय खेळाडू इतक्या ताकदीने खेळतील याचा अंदाज कोणीही बांधला नव्हता. हे ‘फाफु’त आलेले पहिले वळण होते.

स्पर्धा हळूहळू पुढे सरकली आणि त्यातील चुरस अधिक आव्हानात्मक होत गेली. एक चूक किती महागात पडू शकते याची अनुभूती सगळ्याच संघांनी घेतली. फरक इतकाच की काही त्यातून तरले, तर काही रीत्या हातांनी माघारी फिरले. उपांत्यपूर्व फेरीतील इराणचा मेक्सिकोवरील विजय, उपान्त्यपूर्व फेरीतील मालीचा घानावरील विजय, या निकालांनी हेच शिकवले. इराणने मेक्सिकोला नमवून पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या पलीकडे आपला तग लागणार नाही हे त्यांना माहीत होते. तरीही त्यांनी स्पेनविरुद्ध स्वत:ला झोकून खेळ केला. ते मायदेशात पराभवानंतरही ताठ मानेने परतले. आशिया खंडाचे आव्हान त्यांनी जिवंत ठेवले होते. या स्पध्रेत सर्वाधिक चर्चा रंगली ती ब्राझील आणि जर्मनी यांच्या लढतीची. हा सामना म्हणजे दर्दी फुटबॉलप्रेमींसाठी सुवर्ण पर्वणीच. दोन्ही संघामध्ये वरिष्ठ स्तरावर रंगणारी चुरस याही लढतीत पाहायला मिळाली. ७० व्या मिनिटापर्यंत ०-१ असा पिछाडीवर असलेल्या ब्राझीलने केलेला पलटवार जर्मनीच्या चांगलाच जिव्हारी लागला.

मध्यंतराच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या या चित्रपटाला नाटय़मय वळण मिळाले ते ब्राझीलच्या पराभवाने. ब्राझीलच्या समर्थनार्थ संपूर्ण सॉल्ट लेक स्टेडियम एकवटले असूनही इंग्लंडच्या खेळाडूंनी अनपेक्षित निकाल नोंदवून सगळ्यांना अवाक् केले. कुठे तीन जेतेपदं नावावर असलेला ब्राझील आणि कुठे चौथ्यांदा विश्वचषक स्पध्रेत खेळणारा इंग्लंड. हे नाटय़मय वळण स्पध्रेला उंच शिखरावर घेऊन गेलं.

जर्मनी, घाना, ब्राझील, फ्रान्स हे जेतेपदाच्या शर्यतीत असलेले नायक बाद झाले आणि समोर अनोळखी नायक आला. हा नायक होता इंग्लंडचा संघ. स्पध्रेत एकही पराभव न पत्करता अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो एकमेव संघ होता. उपान्त्यपूर्व फेरीतील जपानविरुद्धची लढत वगळली तर सर्व सामने इंग्लंडने एकतर्फी जिंकले. अंतिम लढतीत खलनायक कुणीच नव्हता. ही लढत होती युरोपातील महासत्ताधारी कोण याची. स्पेन आणि इंग्लंडच्या या सामन्यात माजी उपविजेत्या आणि युरोपियन १७ वर्षांखालील स्पर्धा जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाला अधिक पसंती होती. पण अनपेक्षित घोडदौड करणाऱ्या इंग्लंडने सर्वाना चुकीचे ठरवले. ०-२ अशा पिछाडीवरून त्यांनी ५-२ असा विजय मिळवत पहिल्यांदा विश्वचषक उंचावला.

इंग्लंडच्या युवा फुटबॉलपटूंसाठी २०१७ हे वर्ष अविश्वसनीय ठरले आहे. त्यांनी फिफा २० वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा आणि यूएफा युरोपियन १९ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र, युरोपियन १७ वर्षांखालील स्पध्रेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या वर्षांत त्यांनी चार प्रमुख स्पर्धाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यातील तीन जिंकल्या. अनपेक्षित चढउतारांच्या या चित्रपटात इंग्लंड नायक ठरला आणि ‘ फाफु’ने भारतीयांची मने जिंकली.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा