अर्जेंटिनाने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने ४-२ असा विजय मिळवला. अंतिम फेरीतील पराभवानंतर फ्रान्समधील चाहत्यांचा संयम सुटला असून देशाच्या विविध भागात दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थानिक वृत्तानुसार, अर्जेंटिनाच्या हातून झालेल्या पराभवानंतर पॅरिसमध्ये भीषण हिंसाचार झाला आणि चाहत्यांनी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली. येथे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

फिफा विश्वचषक फायनलसाठी फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. येथे मोठ्या पडद्यावर विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिला जात होता, दरम्यान, सामन्याचे वातावरण तापत असताना चाहत्यांचे ठोकेही वाढले.

मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला पराभवाला सामोरे जावे लागताच परिस्थिती अनियंत्रित झाली. तसेच विविध शहरांतून हिंसाचाराच्या बातम्या आल्या. पॅरिसशिवाय लायनमध्येही पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, इथेही चाहत्यांनी वाहने पेटवली.

हेही वाचा – FIFA World Cup Final: गतविजेत्यांना दे धक्का! मेस्सीचे स्वप्न साकार करत अर्जेंटिनाने कोरले विश्वचषकावर नाव

फ्रान्सच्या वेगवेगळ्या शहरांमधून काही व्हिडिओ आणि फोटो समोर आली आहेत, ज्यात लोक गाड्यांची तोडफोड करताना आणि त्यांना आग लावताना दिसत आहेत. पॅरिसमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते, मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. कारण लाखो चाहते रस्त्यावर उतरले होते आणि अंतिम फेरीतील पराभवानंतरच ते अनियंत्रित झाले.

हेही वाचा – FIFA World Cup Final 2022 : विश्वविजयी मेसी

फिफा विश्वचषक फायनलबद्दल बोलायचे झाले, तर कतारमधील लुसेल स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. या सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमधून झाला. सामन्याची नियोजित वेळ संपली तेव्हा स्कोअर ३-३ असा होता. फ्रान्ससाठी या सामन्यात एमबाप्पेने हॅट्ट्रिक केली तर लिओनेल मेस्सीने दोन गोल केले. अर्जेंटिनाने हा विश्वचषक पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकला आणि ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 arg vs fra after the defeat in the final round violence broke out in france cars were burnt by fans police had to burst tear gas canisters vbm