फिफा विश्वचषक २०२२ मध्ये पोर्तुगालची नेत्रदीपक कामगिरी कायम आहे. सोमवारी (२८ नोव्हेंबर) रात्री उशिरा लुसेल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या गट-एच सामन्यात पोर्तुगालने उरुग्वेचा २-० असा पराभव केला. या विजयासह क्रिस्टियानो रोनाल्डोच्या संघाने अंतिम-१६ (प्री-क्वार्टर फायनल) मध्ये प्रवेश केला आहे. याआधी फ्रान्स आणि ब्राझीलनेही अंतिम-१६ चे तिकीट निश्चित केले आहे. उरुग्वेविरुद्ध पोर्तुगालच्या विजयाचा हिरो ब्रुनो फर्नांडिस होता ज्याने दोन गोल केले. जरी कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो या सामन्यात कामी आला नाही आणि त्याला ८२व्या मिनिटाला बदली करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोर्तुगालचा दोन सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे, ज्यामुळे ते सहा गुणांसह ग्रुप-एच मध्ये अव्वल आहे. दुसरीकडे घानाचा संघ तीन गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण कोरिया तिसर्‍या क्रमांकावर आणि उरुग्वे प्रत्येकी एक गुणासह चौथ्या क्रमांकावर आहे. उरुग्वेला आता पुढील फेरी गाठण्यासाठी घानाला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागणार आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पूर्वार्धात दोन्ही संघ ०-० असे बरोबरीत होते. पोर्तुगीज संघाचा एकही फटका लक्षभेद करू शकला नाही. सामन्याच्या उत्तराधार्त अर्ध्या अखेरीस त्याने उरुग्वेविरुद्ध खेळ आणखी तीव्र करत अधिक आक्रमण करण्यावर भर दिला. तत्पूर्वी, पूर्वार्धात तीन पोर्तुगीज बचावपटूंना चकवा देत हरवल्यानंतर रॉड्रिगो बेंटनकूर गोल करण्याच्या अगदी जवळ गेला होता. उरुग्वेला गोल करण्याची मोठी संधी चालून आली होती, पण त्याने मारलेला फटका थेट पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कोस्टा याच्या हाती गेला.

उत्तरार्धात पोर्तुगालने नव्या दमाने सुरुवात केली. परिणामी, दुसऱ्या सत्राच्या पहिल्या १० मिनिटांतच पोर्तुगीज संघाने एक गोल केला. ब्रुनो फर्नांडिसने (५४व्या मिनिटाला) राफेल गुरेरोच्या उत्कृष्ट क्रॉसवर संघासाठी हा गोल केला. मात्र, एका प्रसंगी बॉलला शेवटचा टच क्रिस्टियानो रोनाल्डोने केला आणि तोही गोलचा आनंद साजरा करत होता.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022 : घानाची कोरियावर संघर्षपूर्ण मात

पण ब्रुनो फर्नांडिसच्या खात्यात गोल झाला, तोही ऑफसाइड होता का यावर बरीच पंचांमध्ये चर्चा झाली. १-० ने पिछाडीवर पडल्यानंतर उरुग्वेने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला पण पोर्तुगीज बचाव भेदता आला नाही. रिव्हर्स इंज्युरी टाइममध्ये (९३वे मिनिट) त्याने दुसरा गोल केला. ब्रुनो फर्नांडिसने पेनल्टीद्वारे हा गोल केला. जोस जिमेनेझच्या बॉक्समधील हँडबॉलमुळे पोर्तुगालला हा पेनल्टी मिळाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 bruno fernandes hero of victory portugal beat uruguay to reach round of 16 avw