अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी मेक्सिकोविरुद्धच्या विजयात महत्त्वपूर्ण गोल केल्यानंतर नव्या वादात सापडला आहे. ही घटना विजयानंतरच्या उत्सवाबद्दल आहे. शनिवारी मेक्सिकोविरुद्धच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष झाला. तेव्हा मेक्सिको संघाची जर्सी मेस्सीच्या पायाजवळ पडली होती. मेक्सिको संघाचे समर्थक सोशल मीडियावर मेस्सीवर टीका करत आहेत. मेक्सिकन बॉक्सर कॅनेलो अल्वारेझने ट्विटरवर सांगितले की, “मेस्सी मेक्सिकन जर्सीचा वापर जमीन स्वच्छ करण्यसाठी करत आहे. हे मेक्सिकन लोकांचा अनादर करणारे आहे. तो माझ्यासमोर चुकुनही येऊ नये म्हणून त्याने देवाकडे प्रार्थना करावी. मी अर्जेंटिनाचा जसा आदर करतो तसा मेस्सीने मेक्सिकोचा आदर केला पाहिजे.
या सामन्यानंतर लिओनेल मेस्सीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ ड्रेसिंग रूमचा होता. यामध्ये तो आपल्या सहकारी खेळाडूंसोबत विजयाचा आनंद साजरा करत आहे. मात्र, सेलिब्रेशनदरम्यान आपला बूट काढण्याच्या प्रयत्नात मेस्सीने पडलेल्या मेक्सिकोच्या जर्सीला लाथ मारल्याचे दिसते. यामुळे अनेक मेक्सिकन चाहते संतप्त झाले. त्यांनी या कृत्याचा निषेध करत हा मेक्सिकोचा अपमान आहे असे म्हणत यावर संताप व्यक्त केला आहे. खरं तर, मॅचनंतर मेस्सीने मेक्सिकन खेळाडूसोबत आपली जर्सी बदलली. लॉकर रूममध्ये शूज काढत असताना अनवधानाने त्याचा पाय जमिनीवर पडलेल्या जर्सीवर पडला. अर्जेंटिनाचा माजी फॉरवर्ड सर्जियो अग्युरो मेस्सीच्या समर्थनार्थ पुढे आला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेक्सिकोतील अनेक मोठी नावे प्रतिक्रिया देत आहेत. त्यात चॅम्पियन बॉक्सर कॅनेलो अल्वारेझच्या नावाचाही समावेश आहे. त्यांनी एकामागून एक अनेक ट्विट केले. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत ६२ लढती लढलेल्या कॅनेलोने लिहिले – तुम्ही मेस्सीला आमच्या शर्ट आणि ध्वजाने फरशी साफ करताना पाहिले आहे का? त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले – चाहते एक गोष्ट आहेत, आम्ही एक उदाहरण ठेवले. फुटबॉलमध्ये ते आमच्यापेक्षा सरस आहेत ही एक गोष्ट आहे, पण आदर दाखवणे ही दुसरी गोष्ट आहे.
कॅनेलोच्या ट्विटला उत्तर देताना ते म्हणाले, “मिस्टर कॅनेलो, लढण्यासाठी सबब शोधू नका.” तुम्हाला सॉकरबद्दल काहीच माहिती नाही. लॉकर रूममध्ये, शर्ट घामाने भिजल्यामुळे बहुतेक सर्वच खेळाडू तो काढून जमिनीवर ठेवला जातो. स्पेनचा माजी खेळाडू फॅबर्जेस म्हणाला – ड्रेसिंग रूममध्ये टी-शर्ट जमिनीवर असणे सामान्य आहे. बहुतेक खेळाडू असे करतात, कारण त्यानंतर ती लाँड्रीमध्ये जाते.”
दोनवेळच्या विश्वविजेत्या अर्जेंटिनाने शनिवारी मेक्सिकोचा २-० असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिना संघाच्या फिफा विश्वचषकाच्या राउंड ऑफ १६ मध्ये पोहोचण्याच्या आशा अबाधित राहिल्या आहेत. आता अर्जेंटिनाचा सामना पोलंडशी ३० नोव्हेंबरला होणार आहे. जर संघाने तो सामना जिंकला तर तो गटात अव्वल स्थानी राहून १६व्या फेरीसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी, अनिर्णित राहिल्यास, संघाला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून रहावे लागेल. पोलंडविरुद्धचा पराभव अर्जेंटिनासाठी कठीण होऊ शकतो.