फिफा विश्वचषक २०२२ मध्ये अर्जेंटिनाने शानदार खेळ दाखवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी (९ डिसेंबर) उशिरा खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा ४-३ असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियाशी होईल, ज्यांनी ब्राझीलला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतही बराच गदारोळ पाहायला मिळाला. मॅच रेफरी माटेयू लाहोज यांनी या सामन्यात एकूण १४ पिवळे कार्ड दाखवले. यादरम्यान अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीलाही निर्धारित वेळेच्या काही मिनिटे आधी पिवळे कार्ड मिळाले. मेस्सी रेफ्री लाहोजशी वाद घालतानाही दिसला. लिओनेल मेस्सी आणि स्पॅनिश रेफ्री लाहोज यांचे अजिबात पटत नाही. सामन्यानंतर मेस्सी म्हणाला, ‘मला रेफ्रीबद्दल बोलायचे नाही कारण तो प्रामाणिक असू शकत नाही. जर तुम्ही बोललात तर ते तुम्हाला शिक्षा करतात. फिफाने याची दखल घ्यावी. या गोष्टींसाठी ते असे रेफरी नेमू शकत नाहीत. त्यांनी असे रेफरी ठेवू नयेत जे त्यांचे कार्य योग्यरित्या पूर्ण करत नाहीत.
२०२० मध्ये बार्सिलोना आणि ओसासुना यांच्यातील सामन्यादरम्यान, लाहोजने मेस्सीला कार्ड दाखवले कारण त्याने आपली जर्सी काढून दिवंगत डिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहिली होती. दुसर्या एका प्रसंगात, स्पॅनिश रेफरीने २०१३-१४ ला लीगा दरम्यान ऍटलेटिको माद्रिद विरुद्ध लिओनेल मेस्सीचा गोल नाकारला. यामुळे सामना १-१ असा बरोबरीत सुटला आणि अॅटलेटिको माद्रिद चॅम्पियन बनला.
हेही वाचा: IND vs BAN 3rd ODI: पठ्ठ्याने मैदान मारलं! इशान किशन थाटात द्विशतकीय क्लबमध्ये दाखल
अर्जेंटिना-नेदरलँड्स असा झाला सामना
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर अर्जेंटिनाच्या नहुएल मोलिनाने पहिला गोल केला, ज्यामध्ये लिओनेल मेस्सीने सहाय्य केले होते. या गोलमुळे अर्जेंटिनाने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये जवळपास २८ मिनिटे एकही गोल झाला नाही. ७३व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली, त्यावर लिओनेल मेस्सीने गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
यानंतर नेदरलँड्सवर परतण्याची पाळी आली. खेळाच्या ८३व्या मिनिटाला बाउट बेघोर्स्टने हेडरवर गोल करत गुणसंख्येचा फरक २-१ असा केला. नंतर, स्टॉपेज टाईमच्या शेवटच्या मिनिटात, बेघोर्स्टने नेदरलँड्ससाठी दुसरा गोल केला, ज्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत राहिल्यानंतर, मॅट अतिरिक्त वेळेत गेला जेथे एकही गोल झाला नाही. . यानंतर पेनल्टी शूटआऊटचा सहारा घ्यावा लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने चार पेनल्टी किकमध्ये रुपांतर केले. त्याचवेळी डच संघाला तीन गोल करता आले.