फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी मैदान तयार झाले आहे. गतविजेते फ्रान्स आणि अर्जेंटिना (FRA vs ARG) हे संघ रविवारी (18 डिसेंबर) कतारमधील लुसेल स्टेडियमवर भिडतील. या शानदार सामन्यासाठी दोन्ही संघांनी पूर्ण तयारी केली आहे. स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी विश्वचषकातील शेवटचा सामना खेळताना दिसणार आहे, तर युवा फ्रेंच स्टार किलियन एमबाप्पेही आपल्या वेगानं प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानही या हायव्होल्टेज मॅचची आतुरतेने वाट पाहत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा सामना पाहण्यासाठी नोरा फतेही, करिश्मा कपूर, शनाया कपूर, चंकी पांडे, आदित्य रॉय कपूर, दीपिका पदुकोण, संजय कपूर, कार्तिक आर्यन, आणि अनन्या पांडेसह अनेक बॉलिवूड कलाकार कतारला पोहोचले आहेत. हे सर्वजण लिओनेल मेस्सीचे चाहते आहेत. मात्र याच दरम्यान बॉलिवूडचा बादशाह म्हटला जाणारा शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या वादात अडकला आहे.

शाहरुख खानला विचारला फिफाचा हा प्रश्न –

या वादाच्या भोवऱ्यात शाहरुखही फिफाचे सामने चुकवत नाहीये. यावेळी शाहरुख खानने फायनलमध्ये कोणत्या संघाला आणि कोणत्या खेळाडूला सपोर्ट करणार याचा खुलासाही केला आहे. खरं तर, पठाण वादाच्या दरम्यान, शाहरुखने शनिवारी सोशल मीडियावर १५ मिनिटांसाठी #AskSRK ट्रेंड सुरू केला. या हॅशटॅगद्वारे चाहत्यांनी शाहरुख खानला अनेक प्रश्न विचारले, ज्यांना किंग खाननेही उत्तर दिले.

दरम्यान, एका चाहत्याने फिफा वर्ल्ड कपशी संबंधित प्रश्न विचारला. त्याने विचारले, ‘वर्ल्ड कप फायनलमध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात?’ याला उत्तर देताना शाहरुखने लिहिले, ‘अरे यार, मन सांगत आहे की मेस्सी? पण एमबाप्पेही पाहण्यासारखा आहे.’

रोनाल्डो मेस्सीपेक्षा सरस का?

या प्रश्नोत्तरादरम्यान एका यूजरने शाहरुखला विचारले की, पोर्तुगाल संघाचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो लिओनेल मेस्सीपेक्षा सरस का? याला शाहरुखनेही आपल्या शैलीत उत्तर दिले. किंग खान म्हणाला, ‘एक सल्ला आहे चांगले शोधू नका… यामुळे चांगल्या गोष्टीचाही नाश होतो.’

धोनीला पाहून शाहरुख होतो नर्व्हस –

शाहरुख खान आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) फ्रँचायझीचा मालक देखील आहे. या आयपीएलची आठवण करून देत आणखी एका युजरने महेंद्रसिंग धोनीशी संबंधित प्रश्न विचारला. युजरने विचारले की, जेव्हा धोनी केकेआरविरुद्ध फलंदाजीला येतो तेव्हा तुम्हाला कसे वाटते? याला उत्तर देताना शाहरुख हसला आणि म्हणाला की तो नर्व्हस होतो.

हेही वाचा – Fifa WC 2022 Final: चार वर्षांपूर्वीची जखम भरून काढण्यासाठी फ्रान्सविरुद्ध मेस्सी उतरणार मैदानात, ३६ वर्षांपासून आहे विजेतेपदाचे वेध

गोल्डन बूटच्या शर्यतीत मेस्सी-एमबाप्पे –

वास्तविक, फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत फ्रान्स आणि अर्जेंटिना संघ यांच्यात सामना होणार आहे. हा सामना आज (१८ डिसेंबर) भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० पासून खेळवला जाईल. लिओनेल मेस्सी आणि किलियन एमबाप्पे हे गोल्डन बूटच्या शर्यतीतील सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत. दोन्ही खेळाडूंनी समान ५-५ गोल केले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 final actor shah rukh khan has revealed who he supports lionel messi or kylian mbappe vbm
Show comments