फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना संघांत खेळला जात आहे. अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आपला शेवटचा विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे तो हा विश्वचषक जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसणार आहे. फिफा विश्वचषक विजेत्या संघाला चमकदार ट्रॉफी नक्कीच मिळेल. त्याचबरोबर गोल्डन बूट, गोल्डन ग्लोव्हज, गोल्डन बॉल असे पुरस्कारही दिले जाणार आहेत, त्यासाठी खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा आहे.
स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे गोल्डन बूट, जो सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. या पुरस्काराच्या विजेत्याला सोन्याचे बूट दिले जातील. फ्रेंच स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी सध्या गोल्डन बूट पुरस्काराच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मेस्सी आणि एमबाप्पे या दोघांनी आतापर्यंत सहा सामन्यांत पाच गोल केले आहेत. अर्जेंटिनाचा ज्युलियन अल्वारेझ आणि फ्रान्सचा ऑलिव्हियर गिरोड हेही ४-४ गोलांसह गोल्डन बूटच्या शर्यतीत आहेत.
गोल्डन बूट दावेदार :
१. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) – ५ गोल
२. कायलियन एमबाप्पे (फ्रान्स) – ५ गोल
३. ऑलिव्हियर गिरौड (फ्रान्स) – ४ गोल
४. ज्युलियन अल्वारेझ (अर्जेंटिना) – ४ गोल
फिफा विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूला गोल्डन बॉल पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंना सोन्याचा चेंडू मिळतो. विशेष बाब म्हणजे गेल्या सहापैकी पाच विश्वचषकांमध्ये ज्या खेळाडूंचा संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला होता, त्यांना गोल्डन बॉल देण्यात आला होता. अशा स्थितीत यावेळीही उपविजेत्या संघातील खेळाडूला गोल्डन बॉल मिळण्याची अपेक्षा आहे.
जर फ्रान्सचा संघ अंतिम फेरीत पराभूत झाला, तर किलियन एमबाप्पे, अँटोनी ग्रिजमन आणि ऑलिव्हर गिरोडसारखे खेळाडू गोल्डन बॉलचे दावेदार असतील. दुसरीकडे, अर्जेंटिना संघाचा पराभव झाल्यास, लिओनेल मेस्सी, ज्युलियन अल्वारेझसारखे खेळाडू या प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या शर्यतीत असतील.
गोल्डन बॉल शर्यतीतील खेळाडू:
१. किलियन एमबाप्पे (फ्रान्स)
२. अँटोइन ग्रिजमन (फ्रान्स)
३. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)
४. ऑलिव्हियर गिरौड (फ्रान्स)
५. ज्युलियन अल्वारेझ (अर्जेंटिना)
गोलरक्षकाला गोल्डन ग्लोव्हज मिळतील –
स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षकाला गोल्डन ग्लोव्हज दिले जातात. लेव्ह याशिन यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार १९९४ मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर २०१० वर्ल्ड्समधून त्याचे गोल्डन ग्लोव्हज असे नामकरण करण्यात आले.
गोल्डन ग्लोव्हजचा सर्वात मोठा दावेदार मोरोक्कोचा खेळाडू यासिन बोनो आहे. बोनोच्या गोलकीपिंगमुळे विरोधी संघाला मोरोक्कोविरुद्ध केवळ दोनच गोल करता आले. याशिवाय डॉमिनिक लिव्हकोविक, एमी मार्टिनेझ आणि ह्यूगो लॉरिस हे देखील या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.
गोल्डन ग्लोव्हजच्या शर्यतीत हे गोलकीपर:
१.यासिन बोनो (मोरोक्को)
२.डोमिनिक लिव्हकोविक (क्रोएशिया)
३.एमिलियानो मार्टिनेझ (अर्जेंटिना)
४.ह्यूगो लोरिस (फ्रान्स)