फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रविवारी होणार आहे. या सामन्यात अर्जेंटिना आणि फ्रान्सचे संघ आमनेसामने असणार आहेत. जे तिसरे विजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. भारतासह अनेक देशांमध्ये फायनलची प्रचंड क्रेझ आहे. तसेच सगळ्याच्या ओठावर मोठ्या प्रमाणात अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचे नाव येत आहेत. कारण ही त्याची शेवटची वर्ल्डकप फायनल असणार आहे. अशात अर्जेंटिना संघाच्या जर्सीला मोठी मागणी असल्याचे दिसत आहे.
फायनलपूर्वी अर्जेंटिनाच्या जर्सीला जगभरातून प्रचंड प्रमाणात मागणी वाढली आहे. जर्सी निर्माता आदिदासने एका निवेदनात म्हटले आहे की, सध्या जगात अर्जेंटिना संघाची जर्सी खरेदी करण्याची लोकांमध्ये क्रेझ आहे, परिस्थिती अशी आहे की काही देशांमध्ये स्टॉक जवळजवळ संपला आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आदिदासच्या प्रवक्त्याने माहिती दिली आहे की, जगभरात अर्जेंटिनाच्या जर्सी आणि किट्सच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी साठा कमी झाला आहे. कोठेही साठा संपू नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
अदिदास अर्जेंटिनाचा अधिकृत प्रायोजक आहे. तो जगातील सर्वात मोठा स्पोर्ट्स ब्रँड देखील आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जर्सी आणि किटला जगभरातून खूप मागणी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, २०१८ च्या रशिया विश्वचषकापेक्षा यावेळी अधिक मागणी आहे, जी सुमारे ३० टक्क्यांनी वाढली आहे.
जर्मनी विश्वचषकातून बाहेर पडल्यामुळे कंपनीच्या विक्रीत घट होईल, अशी भीती बाजारात होती, मात्र तसे झाले नाही. विश्वचषकादरम्यान कंपनीने सुमारे ४२५ दशलक्षची विक्री केली आहे. वर्ल्ड कपमध्ये सात संघ असे होते, ज्यांचे प्रायोजक अदिदास होते. त्यापैकी ३ संघ बाद फेरीत पोहोचले होते.