आज कतारमधील लुसेल स्टेडियमवर फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना संघात रात्री खेळला जाणार आहे. सामन्याला रात्री ८:३० सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी लिओनेल मेस्सीच्या फिटनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार, जो सध्या पूर्ण तंदुरुस्ती परत मिळविण्याच्या शर्यतीत आहे. तो गुरुवारी सराव सत्राला उपस्थित नव्हता. फूट मर्काटोच्या मते, त्याला त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये अस्वस्थता जाणवत होती. त्यामुळे तो सहभागी झाला नव्हता.
अर्जेंटिनाच्या शेवटच्या प्रशिक्षण सत्रात तो उपस्थित होता आणि रॉड्रिगो डी पॉलच्या बरोबर तो चांगल्या मूडमध्ये दिसला. त्यामुळे पीएसजी स्टारने हा मुद्दा बाजूला केल्याचे दिसत आहे. अर्जेंटिना राष्ट्रीय संघाने प्रशिक्षण सत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्यांनी संघाचे कौतुक केले आहे.
अर्जेंटिना सहाव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. फक्त जर्मनी संघ त्यांच्या पुढे आहे. ज्यांनी सर्वाधिक वेळा अंतिम सामने खेळले आहेत. अर्जेंटिना १९७८ आणि १९८६ मध्ये जिंकल्यानंतर ते तिसऱ्यांदा ट्रॉफी उचलण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात जर त्यांचा पराभव झाला तर ते लाजिरवाणा विक्रम नोंदवताना जर्मनीची बरोबरी करतील. कारण जर्मनी अंतिम सामन्यात सर्वाधिक जास्त म्हणजे ४ वेळा पराभवाचा सामना केला आहे.
अंतिम सामन्यापूर्वी, अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी खुलासा केला की आगामी खेळ मेस्सी आणि किलियन एमबाप्पे यांच्यापेक्षा खूपच जास्त आहे. ते म्हणाले,”आम्ही या प्रक्रियेत अनेक खेळाडूंना बोलावले. आम्हाला याचा खूप आनंद आहे. या राष्ट्रीय संघातून गेलेले सर्वजण चांगल्या स्थितीत गेले आहेत. हे नि:संशयपणे साध्य झाले आहे. आमचा सर्वात मोठा विजय हा आहे की प्रत्येकाला संघाचा भाग असल्याचे वाटते. हे खूप महत्वाचे आहे. सामना सुरू होईपर्यंत आम्हाला या क्षणांचा आनंद घ्यायचा आहे. हे सर्व इतिहासात कायम राहील.”
स्कालोनी पुढे म्हणाले, “आम्ही जगत आहोत त्या क्षणाचा मला अभिमान आणि उत्साह आहे. आम्ही अंतिम फेरीच्या मार्गावर आहोत पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता आहे. मला आशा आहे की प्रत्येकजण आमच्यात सामील होईल आणि आम्ही त्यांना आनंद देऊ शकू .आशा आहे की आम्ही चषक जिंकू शकू.”
लिओनेल स्कालोनी म्हणाले,” ते खूपच छान होईल. त्यांच्यावर आक्रमन कसे करायचे हे आम्हाला माहित आहे. आमच्याकडे स्पष्ट गेम प्लॅन आहे. मला विश्वास आहे की आमच्याकडे जगातील सर्वोत्तम चाहते आहेत. त्यांना आनंदाची गरज होती आणि मला खात्री आहे की आम्ही ते त्यांना देत आहोत.”
मेस्सीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “जर लिओचा अर्जेंटिनासोबतचा हा शेवटचा सामना असेल, तर आम्हाला आशा आहे की आम्ही चषक जिंकू शकू. त्याचा आनंद घेण्यासाठी विश्वचषक फायनलपेक्षा चांगली परिस्थिती नाही.”