फिफा विश्वचषक २०२२ विजेतेपदाचा सामना रविवारी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात झाला. यादरम्यान दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. पण शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. इथे लिओनेल मेस्सीच्या संघाने चमकदार कामगिरी करत फ्रान्सचा ४-२ असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. त्यानंतर लिओनेल मेस्सी आणि त्याच्या टीमच्या इतर सर्व खेळाडूंनी अगोदर मैदानावर जल्लौष केला. तसेच खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये देखील आपला विजय मोठ्या उत्साहाने साजरा केला.ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मेस्सी ड्रेसिंगमध्ये टेबलवर मस्ती करताना दिसत आहे. मेस्सी विश्वचषक ट्रॉफी हातात घेऊन लॉकर रूममध्ये दाखल झाला. तो ताबडतोब टेबलच्यावर चढला. ज्यानंतर संपूर्ण खोली आनंदाने दुमदुमली. अर्जेंटिनाचा कर्णधार लॉटारो मार्टिनेझसोबत मजा करण्यासाठी सामील झाला. त्यानंतर ते दोघेही ट्रॉफीवर घेऊन थिरकताना दिसले.

हेही वाचा – Fifa WC 2022 Final: अंतिम फेरीतील पराभवानंतर फ्रान्समध्ये चाहत्यांनी जाळली वाहने;पोलिसांना फोडाव्या लागल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

असा राहिला सामना –

९० मिनिटांच्या खेळानंतर २-२ अशी बरोबरी होती. त्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेनंतर स्कोअर ३-३ असा बरोबरीत होता. यानंतर पेनल्टी शूटआऊटमधून सामन्याचा निकाल लागला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अनेक चढउतार. पूर्वार्ध अर्जेंटिनाच्या नावावर होता. यानंतर उत्तरार्धात एमबाप्पेने दोन मिनिटांत दोन गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये मेस्सीच्या संघाने ४-२ असा विजय मिळवला.

हेही वाचा – FIFA World Cup Final: गतविजेत्यांना दे धक्का! मेस्सीचे स्वप्न साकार करत अर्जेंटिनाने कोरले विश्वचषकावर नाव

दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सचा संघ अतिशय आक्रमक दिसला –

दुसऱ्या हाफमध्ये मात्र फ्रान्सचा संघ अतिशय आक्रमक पद्धतीने खेळताना दिसला. सामना एक वेळ अर्जेंटिनाच्या बाजूने गेला आहे असे वाटत असताना स्पर्धेत पाच गोलल झळकावलेला किलियन एमबाप्पे फ्रान्सच्या मदतीला धावला. ८०व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी त्यांनी गोलमध्ये ढकलत पिछाडी भरून काढली. पुढच्याच मिनिटाला त्याने आणखी एक सुरेख गोल करत फ्रान्सला सामन्यात बरोबरी करून दिली. अखेरच्या दहा मिनिटात फ्रान्सच्या संघाने गोल करण्याचे आणखी दोन प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न सफल झाले नाहीत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 final fra vs arg argentinas players celebrated the win in the dressing room in a spectacular way watch the video vbm