लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फिफा विश्वचषकावर ३६ वर्षांनी नाव कोरले आहे. रविवारी रात्री उशिरा फ्रान्सविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत अर्जेंटिनाने विजय मिळवला. अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव केला. ९० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही विजेत्याचा निर्णय होऊ न शकल्याने दोन्ही संघांमध्ये पेनल्टी शूटआऊटचा खेळ झाला. यामध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर शादनदार विजय नोंदवला. यानंतर लिओनेल मेस्सीचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेस्सीने अंतिम फेरीत दोनदा गोल केले आणि अनेक विक्रम मोडले, तर शेवटी तो किलियन एमबाप्पेला गोल्डन बूट मिळवून देऊ शकला नाही, ज्याच्या हॅटट्रिकने कतारमधील अर्जेंटिनाच्या संघाला जवळजवळ बॅकफूटवर ठकलले होते. संपूर्ण स्पर्धेत मेस्सीने पुन्हा एकदा आपल्या देशासाठी मोलाची भूमिका बजावली. मेस्सीने त्याच्या शेवटच्या विश्वचषकात खेळत शेवटी ट्रॉफी जिंकली. जी त्याच्या शानदार कारकिर्दीत इतके दिवस त्याच्यापासून दूर होती.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

अर्जेंटिनाच्या विजयानंतर मेस्सी आणि त्याची आई सेलिया मारिया कुसिटिनी यांच्यातील एक भावनिक क्षण कॅमेऱ्यांनी टिपला. ज्यामध्ये मेस्सीची आई मैदानावर धावत आली आणि आपल्या ३५ वर्षांच्या मुलाने आनंदाने मागे वळून तिला मिठी मारल्याचे क्षण कॅमेऱ्यांनी टिपले. आई-मुलाचा या भावनिक क्षणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर चाहतो मोठ्या प्रमाणात लायक्स आणि कमेंट्स करत आहेत.

अतिरिक्त वेळेनंतर किलियन एमबाप्पेच्या हॅट्ट्रिकने सामना ३-३ अशी संपुष्टात आल्यानंतर अर्जेंटिनाने शूट-आऊटमध्ये ४-२ ने विजय नोंदवला. गोंझालो मॉन्टिएलने निर्णायक पेनल्टीवर गोल करून अर्जेंटिनाला तिसरा विश्वचषक मिळवून दिला. तसेच फ्रान्सला ट्रॉफी बचाव करणारा ६० वर्षांतील पहिला संघ होण्यापासून रोखले.

हेही वाचा – Fifa WC 2022 Final: दीपिका पदुकोणने रचला इतिहास; फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करणारी ठरली पहिली भारतीय

२००६ मध्ये इटलीकडून पराभूत झाल्यानंतर पाच विश्वचषकांमध्ये फ्रान्स पेनल्टीवर अंतिम फेरीत हरण्याची दुसरी वेळ होती. या विजयामुळे मेस्सीने महान डिएगो मॅराडोनाचे अनुकरण करून वयाच्या ३५ व्या वर्षी आपली शानदार कारकीर्द पूर्ण केली. १९८६ मध्ये अर्जेंटिनाच्या शेवटच्या विश्वचषक विजयात मॅराडोनाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.