फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. अर्जेंटिना आणि फ्रान्स हे संघ एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. एकीकडे लिओनेल मेस्सीचा संघ ३६ वर्षांनंतर विजेतेपदाची नोंद करू पाहत आहे. दुसरीकडे, फ्रान्स सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. दोन्ही संघांमध्ये असे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांच्यासमोर अनेक मोठे संघ बळी पडले आहेत. अंतिम सामना कतारच्या लुसेल स्टेडियमवर खेळवला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आपल्या संघाला ट्रॉफी मिळवून देण्यासाठी जोरदार तयारीत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १२ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी अर्जेंटिनाने ६ वेळा विजय मिळवला आहे, तर फ्रान्सने केवळ ३ वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. पण २०१८ च्या विश्वचषकात फ्रान्सच्या संघाने बाद फेरीत अर्जेंटिनाचा ४-३ असा पराभव केला. या सामन्यात मेस्सीला एकही गोल करता आला नाही, तर एमबाप्पेने दोन गोल केले होते. त्यामुळे ४ वर्षांनंतर मेस्सीचा संघ त्यांच्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न करेल.

दोन्ही संघांनी दोन वेळा पटकावले विजेतेपद –

हेही वाचा – फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी मेस्सी इथं कुठं फिरतोय? आनंद महिंद्रांनी शेअर केलेला भन्नाट Video पाहून चक्रावाल

दोन्ही संघांनी आतापर्यंत दोनदा जेतेपद पटकावले आहे. फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्याचबरोबर अर्जेंटिनाने त्याआधी १९७८ आणि १९८६ मध्ये ट्रॉफी जिंकली होती. आता ३६ वर्षांनंतर, लिओनेल मेस्सीला त्याच्या संघासाठी ट्रॉफी जिंकून या स्पर्धेला अलविदा करायला आवडेल. याआधी मेस्सीने २०१४ मध्ये वर्ल्डकपची फायनल खेळली होती. त्यादरम्यान संघाला जर्मनीकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा – Fifa World Cup 2022 Final: लिओनेल मेस्सीची क्रेझ! अर्जेंटिनाच्या जर्सीची जगभरात वाढली मागणी, अनेक देशांमध्ये संपला साठा

मेस्सी आणि एमबाप्पे यांच्यात होणार चुरशीची लढत –

२०१८ च्या विश्वचषकादरम्यान, मेस्सीला फ्रान्सविरुद्ध एकही गोल करता आला नाही. मात्र या सामन्यात तो ४ वर्षांपूर्वीची जखम भरून काढण्याच्या आशेने मैदानात उतरणार आहे. पण त्याचा सामना मेस्सीप्रमाणेच या स्पर्धेत पाच गोल करणाऱ्या फ्रेंच अनुभवी किलियन एमबाप्पेशी होणार आहे. लुसेल स्टेडियमवर दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 final messi will enter the field against france to heal the injury suffered four years ago has been chasing the title for 36 years vbm
Show comments