फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रविवारी म्हणजेच आज खेळला जात आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरू होईल. लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्सचे संघ आमनेसामने असतील. लिओनेल मेस्सीकडे विश्वचषक जिंकण्याची शेवटची संधी आहे. कारण या अंतिम सामन्यानंतर तो कोणत्याही विश्वचषकात सहभागी होणार नाही. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा या महान सामन्याकडे लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक २०२२ कडे लागले आहे. विश्वचषक ट्रॉफी जिंकणारा संघ विजेतेपदासह करोडो रुपये घेऊन जाईल. फिफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम खूप जास्त आहे आणि केवळ विजेता संघच नाही तर उपविजेता संघ देखील मालामाल होईल.

एवढा पैसा या संघांच्या खात्यात येणार –

• विजेता – जवळपास ३५० कोटी रुपये रु.
• उपविजेता – जवळपास २५० कोटी रु.
• तिसरा संघ – जवळपास २२० कोटी रु. (क्रोएशिया)
• चौथा संघ – जवळपास २०४ कोटी रुपये (मोरोक्को)

केवळ बाद फेरीत पोहोचणाऱ्या संघांनाच नाही तर विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांनाही फिफाकडून काही रक्कम दिली जाते. कोणत्या संघांना किती रक्कम मिळाली, जाणून घ्या…

• विश्वचषक स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला ९-९ दशलक्ष डॉलर्स
• प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या संघांसाठी १३ दशलक्ष डॉलर्स
• उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या संघांच्या खात्यात १७ दशलक्ष डॉलर्स

विश्वचषकादरम्यान फिफाकडून एकूण ३६४१ कोटी रुपये खर्च केले जात आहेत, जी विविध संघांना बक्षीस म्हणून दिली जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक संघाच्या सहभागाचे शुल्क, सामना जिंकणे, गोल शुल्क आणि विजेते, उपविजेते आणि बाद फेरीत पोहोचलेल्या संघांची रक्कम यांचा समावेश होतो.

फ्रान्स आणि अर्जेंटिना हेड-टू-हेड –

एकूण सामने: १२
अर्जेंटिना विजयी: ६
फ्रान्स विजयी: ३
अनिर्णीत: ३

अर्जेंटिनाचा संघ –

गोलरक्षक: एमिलियानो मार्टिनेझ, जेरोनिमो रुल्ली, फ्रँको अरमानी.
बचावपटू: नहुएल मोलिना, गोंझालो मॉन्टिएल, क्रिस्टियन रोमेरो, जर्मन पेझेला, निकोलस ओटामेंडी, लिसांड्रो मार्टिनेझ, मार्कोस अकुना, निकोलस टॅगलियाफिको, जुआन फॉयथ.
मिडफिल्डर्स: रॉड्रिगो डी पॉल, लिएंड्रो परेडिस, अॅलेक्सिस मॅकअलिस्टर, गुइडो रॉड्रिग्ज, अलेजांद्रो गोमेझ, एन्झो फर्नांडीझ, एक्क्विएल पॅलासिओस.
फॉरवर्ड्स: लिओनेल मेस्सी, एंजल डी मारिया, लॉटारो मार्टिनेझ, ज्युलियन अल्वारेझ, निकोलस गोन्झालेझ, जोक्विन कोरिया, पाउलो डायबाला.

हेही वाचा – Fifa WC 2022 Final: पैसाच पैसा… फायनलमध्ये जिंकू किंवा हरु, दोन्ही संघांना मिळणार करोडो रुपये

फ्रान्सचा संघ –

गोलरक्षक: अल्फान्सो एरिलो, ह्युगो लोरिस, स्टीव्ह मंदाडा
बचावपटू: लुकास हर्नांडेझ, थिओ हर्नांडेझ, इब्राहिम कोनाटे, ज्युल्स कोंडे, बेंजामिन पावार्ड, विल्यम सलिबा, डेओट उपमेकानो, राफेल वाराणे
मिडफिल्डर: एडुआर्डो कॅमविंगा, युसेफ फोफाना, माटेओ गुंडौझी, अॅड्रिन रॅबिओट, ऑरेलियन चौमेनी, जॉर्डन वेरेटोट
फॉरवर्ड्स: करीम बेंझेमा, किंग्सले कोमन, उस्माने डेम्बेले, ऑलिव्हियर गिरौड, अँटोइन ग्रिजमन, कायलियन एमबाप्पे, मार्कस थुराम, रँडल कोलो मुआनी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 final win or lose in the final both the teams will get crores of rupees vbm