अर्जेंटिनाचा दिग्गज लिओनेल मेस्सी, त्याच्या पाचव्या आणि शेवटच्या विश्वचषकात खेळत आहे. लुका मॉड्रिकच्या नेतृत्वाखालील क्रोएशियाचा जबरदस्त बचाव मोडून, मंगळवारी लुसेल स्टेडियमवर फिफा विश्वचषकाची स्वप्नवत अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, ३७ वर्षीय मॉड्रिच चौथ्या आणि शेवटच्या विश्वचषकात सहभागी झाला आहे. मेस्सीचे स्वप्न त्याच्या नेतृत्वाखाली देशाला पहिले विश्वविजेतेपद मिळवून देण्याचे असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३५ वर्षीय मेस्सीची कारकीर्द शानदार आहे. त्याची तुलना डिएगो मॅराडोना या महान फुटबॉलपटूशी केली जाते. अर्जेंटिनाने शेवटचा १९८६ मध्ये मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी मेस्सीचा जन्मही झाला नव्हता. मेस्सीने २०२१ मध्ये १० स्पॅनिश लीग, चार चॅम्पियन्स लीग आणि कोपा अमेरिका स्पर्धा जिंकल्या आहेत. याशिवाय त्याने सात वेळा बॅलोन डी’ओर पुरस्कारही जिंकला आहे.

मेस्सीकडे फक्त फिफा विश्वचषक ट्रॉफी नाही, ज्यासाठी तो गेल्या १६ वर्षांपासून (२००६, २०१०, २०१४, २०१८ आणि आता २०२२) प्रत्येक विश्वचषकात खेळला आहे. आठ वर्षांपूर्वी मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला २०१४ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जर्मनीकडून ०-१ ने पराभव स्विकारावा लागला होता.

मेस्सीच्या आक्रमणाची आणि मॉड्रिचच्या बचावाची कसोटी लागणार –

दुसरीकडे तिसरा उपांत्य सामना खेळाणाऱ्या क्रोएशिया संघाचा आतापर्यंतचा प्रवास नेत्रदीपक राहिला आहे. स्टार स्ट्रायकर मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचे आक्रमण चांगले आहे, तर मिडफिल्डर लुका मॉड्रिकच्या नेतृत्वाखाली क्रोएशियाचा बचाव मजबूत आहे. उपांत्य फेरीत दोघांचीही अग्नीपरीक्षा असेल. रशियात झालेल्या २०१८ च्या विश्वचषक स्पर्धेत क्रोएशिया उपविजेता राहिला होता. यावेळीही उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्यपूर्व फेरीचे सामने पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. १९९८ मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात क्रोएशियाने उपांत्य फेरी गाठली आणि तिसरे स्थान पटकावले होते.

दुसरा उपांत्य सामना बुधवारी फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात होणार आहे. या सामन्यातील विजेता आणि पहिल्या उपांत्य फेरीतील विजयी संघ अंतिम फेरीसाठी खेळतील. तसेच पराभूत संघ तिसऱ्या स्थानासाठी स्पर्धा करतील.

अर्जेंटिना उपांत्य फेरीत कधीही पराभूत झालेला नाही –

अर्जेंटिना संघ मंगळवारी विश्वचषकातील सहावा उपांत्य सामना खेळणार आहे. मागील पाच उपांत्य फेरी (१९३०, १९७८, १९८६, १९९०, २०१४) अर्जेंटिनाने जिंकल्या आहेत. यापैकी अर्जेंटिनाने १९७९८ आणि १९८६ मध्ये विजेतेपद पटकावले, तर तीन वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. त्याचवेळी क्रोएशियाचा संघ तिसरी उपांत्य फेरी खेळणार आहे. ती १९९८ मध्ये हरले होते आणि २०१८ मध्ये जिंकले होते.

दोन्ही संघात होणार काट्याची टक्कर –

अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यात आतापर्यंत एकूण पाच सामने झाले आहेत. या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी विजय मिळवला, तर एक सामना अनिर्णित राहिला. वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि क्रोएशिया दोनदा आमनेसामने आले आहेत. १९९८ विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाने क्रोएशियाचा १-० ने पराभव केला, तर २०१८ विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाने अर्जेंटिनाचा ३-० ने पराभव केला होता. गेल्या विश्वचषकात दोन्ही संघ ग्रुप स्टेजमध्ये आमनेसामने आले होते. प्रथमच उपांत्य फेरीत आमने-सामने असणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 finals dream before messis eyes argentina vs croatia first semi final of fifa world cup today vbm