मेस्सीने अर्जेंटिनाचे त्यांच्या चाहत्यांशी असलेले नातेसंबंध अतिशय सुंदररित्या परिभाषित केले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघाच्या विजयानंतर सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या अतूट पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. कतारचे यजमानपद असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ हंगामात प्री-क्वार्टर फायनलचा दुसरा सामना शनिवारी रात्री उशिरा खेळला गेला. या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या संघाने शानदार खेळ दाखवत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला. यासह अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेस्सीने अर्जेंटिनासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम १६ च्या सामन्यात पहिला गोल केला आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. विश्वचषकात ८ गोल करणाऱ्या दिग्गज डिएगो मॅराडोनाला मागे टाकत स्टार फुटबॉलपटू मेस्सीने विश्वचषकातील आपला ९वा गोल केला. तसेच बाद फेरीतील अर्जेंटिनाचा हा पहिला गोल ठरला. या गोलमुळे तो अर्जेंटिनासाठी विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला, आता गॅब्रिएल बतिस्तुतापेक्षा फक्त एक गोल मागे आहे. पुरस्कार स्वीकारताना त्याने सर्व अर्जेंटिना संघाच्या खेळाचे साक्षीदार असणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांच्याशी असलेले सुंदर नाते अधोरेखित केले.

स्काय स्पोर्ट्स सोबत बोलताना मेस्सीने सांगितले की, “संपूर्ण अर्जेंटिनाला येथे यायला आवडेल, पण ते शक्य नाही. मला वाटते की आमच्यात असलेले हे बंधन, संघटन, अतिशय सुंदर आहे. या आश्चर्यकारक पण तितक्याच सुखद भावना आहेत. त्या सर्वांसोबत आनंदाचे हे सुंदर क्षण सामायिक करताना मला खरोखर आनंद होत आहे.”

अर्जेंटिनाच्या स्टारने संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर गर्दी करणार्‍या चाहत्यांचे कौतुक केले आणि घरी बसून खेळांचा आनंद घेत असलेल्या फुटबॉल चाहत्यांचाही उल्लेख केला. तो पुढे म्हणतो, “येथे प्रत्येक सामन्यात आमच्यासोबत राहण्यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत. मला माहित आहे की त्यांना अर्जेंटिनामध्ये परतण्याचा किती आनंद होतो. ते जे प्रसारित करतात ते अविश्वसनीय आहे, उत्कटता, त्यांची ऊर्जा, त्यांचा आनंद  यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. हे अविश्वसनीय आहे.”

अहमद बिन अली स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम १६ च्या रोमहर्षक फेरीत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करून अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पहिल्या हाफमध्ये एका गोलची आघाडी घेतल्यानंतर अर्जेंटिनाने ब्रेकनंतर लगेचच आपली रणनीती बदलली आणि तीन सदस्यांच्या बचावाकडे वळले. त्यांनी सामरिक स्विचचा परिणाम म्हणून त्यांचा दुसरा गोल केला.

मॅट रायनने एक भयानक चूक केली ज्याचा फायदा ज्युलियन अल्वारेझला झाला. २१ व्या शतकात अर्जेंटिनासाठी सलग विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करणारा मेस्सी अर्जेंटिनाचा तिसरा खेळाडू ठरला. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनासाठी गोल करून लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली.