अर्जेंटिनाविरुद्धच्या आजच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी, फ्रान्सचा गोलरक्षक कर्णधार ह्यूगो लॉरिस आजपर्यंत फिफा विश्वचषकात कोणीही न रचलेला इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. कोणत्याही फुटबॉलपटूने त्याच्या नेतृत्वाखाली दोनदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला नाही, परंतु ह्यूगो लॉरिस त्याच्या नेतृत्वाखाली सलग दुसरा विश्वचषक जिंकण्याच्या मार्गावर आहे. तो त्यात यशस्वी होतो का ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एवढेच नाही तर, किलियन एमबाप्पे, अँटोइन ग्रिजमन, ऑलिव्हियर गिरौड, राफेल वराणे असे एकूण नऊ फ्रेंच फुटबॉलपटू सलग दोन विश्वचषक जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. पेले विश्वचषक इतिहासातील एकमेव फुटबॉलपटू आहे ज्याने तीन विश्वचषक (१९५८, १९६२, १९७०) जिंकले आहेत. याशिवाय असे २० फुटबॉल खेळाडू आहेत ज्यांना दोन विश्वचषक जिंकण्याचा मान मिळाला आहे. यामध्ये १६ ब्राझिलियन, चार इटालियन आणि एका अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचा समावेश आहे. फ्रान्सने जिंकल्यास आणखी नऊ फुटबॉलपटू या यादीत सामील होतील.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Border Gavaskar Trophy History Stats Records Head to Head All You need To Know About India vs Australia Test Series
Border Gavaskar Trophy: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ हे नाव का देण्यात आलं? सर्वाधिक मालिका कोणी जिंकल्यात? वाचा इतिहास
Jalaj Saxena Becomes 1st Player With 6000 Runs and 400 Wickets in History of Ranji Trophy
Ranji Trophy: केरळच्या जलाज सक्सेनाने रणजी ट्रॉफीत घडवला इतिहास, आजवर कोणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Sunil Gavaskar Prediction on Border Gavaskar Trophy
Sunil Gavaskar : ‘टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० ने जिंकूच शकत नाही, जर जिंकली तर मला…’, भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य

हेही वाचा: FIFA WC: यंदाच्या विश्वचषकात दिसली मेस्सीची जादू! अर्जेंटिनाच्या नऊ विद्यमान खेळाडूंच्या बरोबरीत गोल, रोनाल्डोपेक्षा खूप पुढे

सलग दोन वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा लॉरिस हा चौथा कर्णधार

सलग दोन विश्वचषक फायनलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करणारा ह्युगो लोरिस हा चौथा कर्णधार आहे. हा पराक्रम जर्मनीच्या कार्ल हेन्झ रुमेनिगे याने प्रथम केला. १९८२ आणि १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने जर्मनीचे नेतृत्व केले, परंतु दोन्ही गमावले. दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनानेही अर्जेंटिनाला त्याच्या नेतृत्वाखाली सलग दोन विश्वचषक फायनलमध्ये नेले. जिथे अर्जेंटिना १९८६ मध्ये विजेता ठरला होता, तर १९९० मध्ये त्यांना जर्मनीकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. डुंगाने १९९४ आणि १९९८ मध्ये दोनदा ब्राझीलला त्याच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत नेले. १९९४ मध्ये ब्राझील विजेता ठरला आणि १९९८ मध्ये अंतिम फेरीत फ्रान्सकडून पराभूत झाला.

पाच खेळाडूंनी कर्णधार आणि फुटबॉलपटू म्हणून विश्वचषक जिंकला

लॉरिस, एम्बाप्पे, ग्रीझमन, गिरोड, राफेल वाराणे, बेंजामिन पावर्ड, डेम्बेले, गोलकीपर स्टीव्ह मेनेंडा, अल्फान्सो अरेओला हे फुटबॉलपटू आहेत जे या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या फ्रेंच संघातील २०१८ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य आहेत. इटलीच्या ज्युसेप्पे मेझानेही दोन विश्वचषक जिंकले. तो १९३४ च्या विजेत्या संघाचा सदस्य होता, तर १९३८ मध्ये त्याने विश्वविजेतेपदासाठी इटलीचे नेतृत्व केले.

हेही वाचा: IND vs BAN 1st Test: टीम इंडियाने बांगला टायगर्सला चारली धूळ, १८८ धावांनी मात करत मालिकेत घेतली १-० आघाडी

बेलिनी १९५८ मध्ये ब्राझीलचा कर्णधार होता आणि १९६२ मध्ये तो फुटबॉलपटू म्हणून खेळला. त्याचप्रमाणे, मौरो रामोस १९६२ चा विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझील संघाचा कर्णधार होता, तर १९५८ मध्ये तो विजयी संघाचा सदस्य होता. ब्राझीलचा काफू १९९४ च्या विजेत्या संघाचा सदस्य होता, तर २००२ मध्ये तो संघाचा कर्णधार होता. काफू १९९८ च्या फायनलमध्येही खेळला होता. सलग तीन फायनल खेळणारा तो एकमेव फुटबॉलपटू आहे. अर्जेंटिनाचा डॅनियल पासरेला १९७८ मध्ये संघाचा कर्णधार होता, तर १९८६ मध्ये संघाचा सदस्य होता.