शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करून सामन्याचा थरारक शेवट करण्याची लिओनेल मेस्सीची परंपरा डिव्होक ओरिगीने कायम राखला. त्यामुळेच बेल्जियमला रशियाविरुद्ध शानदार विजय मिळवत दुसऱ्या फेरीतील स्थान निश्चित करता आले. ८८व्या मिनिटाला इडन हॅझार्डने डाव्या बाजूने रशियाच्या इश्नेचन्कोला भेदत चेंडू ओरिगीकडे सोपवला. त्याने अगदी जवळच्या अंतरावरून अचूकपणे गोल केला. उर्वरित मिनिटांमध्ये रशियाला रोखत बेल्जियमने सलग दुसऱ्या विजयासह आगेकूच केली.
२०व्या मिनिटाला बेल्जियमच्या ड्राइस मर्टेन्सने गोलसाठी पुरेपूर प्रयत्न केला. चेंडूवर ताबा मिळवल्यानंतर ऑफसाइडचा धोका लक्षात येताच उजव्या पायाने दूर अंतरावरून गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो गोलजाळ्यामध्ये जाऊ शकला नाही. २७व्या मिनिटाला रशियाला पेनल्टीची संधी नाकारण्यात आली.
मर्टेन्सला धक्का दिल्याप्रकरणी रशियाच्या डेनिस ग्लुशकोव्हला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. ४४व्या मिनिटाला ग्लुशकोव्हने बेल्जियमच्या खेळाडूंना चकवत क्रॉसचा सुरेख फटका लगावला. अलेक्झांड्रा कोकोरिनने व्हिन्सेंट कॉम्पनी आणि जॅन व्हटरेनगेन यांना भेदत हेडर केला. मात्र तो गोलजाळ्यापासून खूप अंतरावरून गेला. पहिल्या सत्रात गोल करता न आल्याची निराशा दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर होती. मध्यंतरानंतर रशियाने पेनल्टी कॉर्नरची संधी वाया घालवली. कोकोरिनने कॉम्पनीला बाजूला सारत सामदेवने क्रॉसच्या फटक्याद्वारे कोकोरिनने गोल मारण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न विफल ठरला. ६०व्या मिनिटाला बेल्जियमची पेनल्टी कॉर्नरची संधी सामनाधिकाऱ्यांनी नाकारली.

Story img Loader