इंग्लंड आणि इटली यांच्यातील महत्त्वपूर्ण सामना शनिवारी मनाऊसमधील नव्या कोऱ्या एरिना द अॅमेझोनिया स्टेडियमवर होणार असून या स्टेडियमच्या तयारीची दृश्ये पाहून खेळपट्टी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या सामन्याला अवघे तीन दिवस शिल्लक असताना खेळपट्टीवर काही ठिकाणी गवत नाहीसे झाले असून काही ठिकाणी पिवळे पट्टे दिसत आहेत. अद्यापही हे स्टेडियम पूर्णपणे सज्ज नाही, असे स्टेडियमचे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
खेळाडूंच्या कपडे बदलण्याच्या खोल्यांमध्ये अजूनही विजेच्या तारा लोंबकळत आहेत. स्टेडियमच्या बाहेरील भागावर शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. स्टेडियमच्या प्रवेशद्वारांवर अद्याप दरवाजे बसवण्यात आलेले नाहीत, असे चित्र आहे. ४६ हजार प्रेक्षकक्षमता असलेले हे स्टेडियम खास फिफा विश्वचषकासाठी उभारण्यात आले आहे.
रॉय हॉजसन यांच्या प्रशिक्षकपदाखालील इंग्लंडचा संघ गुरुवारी मनाऊसमध्ये दाखल होणार आहे. पण अॅमेझॉनमधील अतिउष्ण वातावरणाशी कसा लढा द्यायचा, खेळाडूंना कशा पद्धतीने खेळवायचे, याची चिंता हॉजसन यांना सतावत आहे. आता स्टेडियमच्या तयारीच्या बातमीने त्यांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा