विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू झाली, तेव्हा ब्राझीलचा उदोउदो होता. त्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर कधी जर्मनी तर कधी अर्जेटिनाचा संघ होता. ब्राझील आणि जर्मनी यांच्यात अंतिम सामना होईल, असाही होरा होता. आता सट्टेबाजारात जर्मनीचाच बोलबाला आहे. अर्जेटिनाविरुद्धच्या अंतिम सामन्यात बाजी मारून जर्मनी विश्वचषक पटकावेल, या बाजूने सट्टेबाजांनी पसंती दिली आहे. १३ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याआधी या भावात चढउतार होईल, असाही त्यांचा दावा आहे. मात्र हा भाव कोणत्याही परिस्थितीत समान होणार नाही. शेवटपर्यंत जर्मनीलाच पसंती राहील, असे सट्टेबाजांचे म्हणणे आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी ब्राझील आणि नेदरलँड्समध्ये सट्टेबाजांनी ब्राझीलला कौल दिला असला तरी पंटर्सना नेदरलँड्सवर विश्वास आहे. विश्वचषक स्पर्धेतून ब्राझील बाहेर गेल्यामुळे सट्टेबाजांना मात्र चांगलाच फायदा दिला आहे. शेवटपर्यंत पंटर्सनी ब्राझीलला साथ दिली होती.
आजचा भाव :
अंतिम फेरीसाठी
जर्मनी अर्जेटिना
६५ पैसे (१३/१०) सव्वा रुपया (५/२)
तिसऱ्या क्रमांकासाठी
ब्राझील नेदरलँड्स
६५ पैसे (१३/१०) सव्वा रुपया (११/५)
निषाद अंधेरीवाला
गुगलवर फुटबॉलचाहत्यांची झुंबड
विश्वचषकाचा कैफ आता जबरदस्त चढलेला आहे, स्पर्धेची रंगत आता अखेरच्या टप्प्यामध्ये आली असली तरी आतापर्यंतच्या विश्वचषकामध्ये काही रंजक, उत्साहपूर्ण, थरार अशा घटना घडल्या आहे. विश्वचषकाच्या या संस्मरणीय आठवणींना अंतिम फेरीपूर्वी उजाळा देण्यासाठी चाहत्यांनी ‘गुगल’वर एकच गर्दी केली आहे. यामध्ये सर्वाधिक लोकांनी जर्मनीने केलेला ब्राझीलचा पराभव पाहण्याला प्राधान्य दिले आहे, तर काहींनी मिरास्लोव्ह क्लोसचा विश्वविक्रमी गोल पाहणे अधिक पसंत केले आहे. अमेरिकेच्या क्लिंट डेम्प्सीने ३२व्या सेकंदाला केलेला गोल पाहण्यात काही जण गुंग आहेत. देशांच्या सीमा ओलांडून आता सारे फुटबॉलमय झाल्याची ही पोचपावती म्हणावी लागेल.
दिल के अरमाँ आसूओं में बह गये..
चार वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर जगज्जेतेपदाचे स्वप्न हुकले होते, परंतु यंदा ‘ऑरेंज आर्मी’ पराक्रम दाखवेल, या चाहत्यांच्या आशेची राखरांगोळी झाली. उपान्त्य फेरीत अर्जेटिनाकडून हार पत्करल्यानंतर एक निराश चाहता याच साऱ्या दु:खद घटनांचे आत्मचिंतन करताना दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा