ब्राझीलचा दुखापतग्रस्त आक्रमणवीर नेयमार शनिवारी नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीला हजेरी लावणार आहे. नेयमारच्या अनुपस्थितीमुळे खचलेल्या ब्राझीलचा जर्मनीने ७-१ असा धुव्वा उडवला. कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मणक्याला दुखापत झाल्यामुळे नेयमारला विश्वचषक स्पध्रेतून माघार घ्यावी लागली होती.
‘‘नेयमार ब्राझीलच्या सराव शिबिराला येणार आहे, याचप्रमाणे शनिवारी होणाऱ्या लढतीप्रसंगी तो संघासोबत असेल,’’ अशी माहिती ब्राझील फुटबॉल महासंघाचे प्रवक्ते रॉड्रिगो पैवा यांनी सांगितले.
बुधवारी अर्जेटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशी हार पत्करल्यामुळे नेदरलॅण्ड्सचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. याविषयी नेदरलॅण्ड्सचे प्रशिक्षक लुईस व्हॅन गाल म्हणाले की, ‘‘हा सामना कधीच खेळला जाऊ नये, असे मला वाटते. आम्हाला या सामन्याच्या तयारीसाठी प्रतिस्पर्धी संघापेक्षा एक दिवस कमी मिळणार आहे. त्यामुळे ओळीने दुसऱ्या पराभवाची शक्यता अधिक वाढते.’’
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2014 रोजी प्रकाशित
ब्राझीलच्या तिसऱ्या स्थानाच्या लढतीला नेयमार हजेरी लावणार
ब्राझीलचा दुखापतग्रस्त आक्रमणवीर नेयमार शनिवारी नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीला हजेरी लावणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-07-2014 at 05:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2014 neymar to join brazil for third place play off