स्वित्र्झलडच्या खेळाडूंमध्ये विश्वचषक स्पर्धेत अनपेक्षित विजय मिळविण्याची क्षमता आहे. मात्र अनेक वेळा त्यांचे खेळाडू आपल्या क्षमतेइतकी कामगिरी करण्यात अपयशी ठरतात, असाच अनुभव पाहायला मिळत आहे. आतापर्यंत स्वित्र्झलडने तब्बल नऊ वेळा फिफा विश्वचषकात प्रतिनिधित्व केले आहे. या वेळी ते १०व्यांदा आपले नशीब अजमावणार आहेत. आजपर्यंत त्यांनी या स्पर्धेत तीन वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, तर दोन वेळा त्यांना दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
साखळी गटात आश्चर्यजनक निकाल नोंदवण्यात स्विस खेळाडूंची ख्याती आहे. मात्र बाद फेरीत त्यांचे खेळाडू कमी पडतात, असाच अनुभव आहे. १९२४मध्ये त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. त्यावेळी उरुग्वे संघाने त्यांना अंतिम फेरीत पराभूत केले होते. या रौप्यपदकानंतर त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेत निराशाच पाहायला मिळाली आहे. विश्वचषक असो किंवा युरोपीयन स्पर्धा.. त्यांना अपेक्षेइतकी उंची गाठण्यात यश मिळालेले नाही.
यंदाच्या विश्वचषकासाठी झालेल्या पात्रता फेरीत त्यांनी अल्बानिया, सायप्रस यांच्याविरुद्धचे सामने जिंकले. अल्बानियाला त्यांनी सहज हरविले. सायप्रस व स्लोव्हेनिया यांच्यावर मात करताना त्यांना नाकीनऊ आले होते. आर्यलड व नॉर्वे यांच्याविरुद्धच्या सामन्यात त्यांना बरोबरी स्वीकारावी लागली. त्यांनी साखळी गटात अग्रस्थान घेत विश्वचषकाची पात्रता पूर्ण केली.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
अव्वल कामगिरी करण्याची क्षमता स्वित्र्झलडच्या खेळाडूंमध्ये आहे. आघाडी व मधल्या फळीत त्यांच्याकडे अनुभवी खेळाडूंची फौज असल्यामुळे धडाकेबाज चाली करताना त्यांना अडचण येऊ नये. ट्रँक्विटो बर्नेटा, गोखान इन्लेर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंकडून सातत्यपूर्ण चाली होऊ शकतात. फक्त त्यांचे अन्य सहकारी त्यांना कशी साथ देतात, यावरच त्यांचे यश अवलंबून आहे. गेल्या १४ सामन्यांपैकी नऊ सामन्यांत विजय (ब्राझीलवर १-०) हे फक्त स्वित्र्झलडच्या भक्कम बचावामुळे होऊ शकले. धडाकेबाज चाली करण्याबाबत हा संघ ख्यातनाम असला, तरी त्यांच्या चालींमध्ये खूपच विस्कळीतपणा दिसून येतो. बचावफळीतील खेळाडू अनेक वेळा विनाकारण मानसिक दडपण घेतात. परिणामी त्याचा फायदा प्रतिस्पर्धी खेळाडूंना होतो. गोल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अचुकतेमध्येही त्यांचे खेळाडू कमकुवत आहेत.
अपेक्षित कामगिरी
ब्राझीलमधील मुख्य फेरीत त्यांना माजी विजेता फ्रान्स, इक्वेडोर व होंडुरास यांच्याशी खेळावे लागणार आहे. फ्रान्स हा फुटबॉलमधील अव्वल दर्जाचा संघ आहे. त्यांच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारण्यासाठी त्यांना झगडावे लागेल. होंडुरास व इक्वेडोरविरुद्धचे सामने मोठय़ा फरकाने जिंकले तर त्यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होईल. स्वित्र्झलड संघ दुसऱ्या फेरीत मजल मारण्याची शक्यता असली तरी त्यांना फ गटातून आलेल्या अर्जेटिना आणि नायजेरिया किंवा इराण या संघांशी लढावे लागेल. त्यामुळे स्वित्र्झलडची वाटचाल दुसऱ्या फेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाविरुद्ध त्यांचा निभाव लागणे कठीण आहे.
फिफा क्रमवारीतील स्थान :
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : १० वेळा (२०१४ सह)
* उपांत्यपूर्व फेरी : १९३४, १९३८, १९५४
* दुसरी फेरी : १९९४, २००६
संभाव्य संघ
गोलरक्षक : दिएगो बेनाग्लिओ, यान सोमेर, रोमान बुर्की. बचावफळी : स्टीफन लिचस्टेनर, फिलीप सेंडोरोस, योहान जौरोऊ, स्टीव्ह व्हान बर्गेन, रेटो झीएगलर, रिकाडरे रॉड्रिग्ज, फॅबियन स्कार, मायकेल लँग. मधली फळी : ट्रँक्विलो बर्नेटा, गोखान इन्लेर, व्हॅलोन बेहरामी, गेल्सन फर्नान्डेझ, ब्लेरीम झेमेली, झेर्दान शाकिरी, ग्रॅनिट झाका, व्हॅलेन्टीन स्टॉकर. आघाडीची फळी : अॅडमीर मेहमदी, मारिओ गॅव्हेरानोव्हिक, हॅरीस सेफेरोव्हिक, जोसेफ जर्मिक.
ल्ल स्टार खेळाडू : दिएगो बेनाग्लिओ, झेर्दान शाकिरी, ग्रॅनिट झाका, फिलीप सेंडोरोस, योहान जौरोऊ, गोखान इन्लेर.
* व्यूहरचना : ४-२-३-१ किंवा ४-४-२
* प्रशिक्षक : ऑटमेर हिट्झफेल्ड.

Story img Loader