फिफा विश्वचषक म्हणजे ऑलिम्पिकनंतरचा सर्वोत्तम क्रीडासोहळा. फुटबॉल हा खेळ नसानसांत भिनलेल्या ब्राझीलनगरीत गुरुवारपासून हा कुंभमेळा भरणार आहे. आता पुढील महिनाभर अविस्मरणीय थराराची अनुभूती देणाऱ्या ६४ सामन्यांसह ३२ संघांमध्ये जगज्जेतेपदाचा थरार रंगणार आहे. आपल्या देशातील समस्या, युद्धजन्य परिस्थिती, राजकारण या सर्व गोष्टी विसरून संपूर्ण जग या महासोहळ्याच्या महासागरात आकंठ बुडून जाणार आहे. सांबा नृत्याच्या मेजवानीसह गोलांची बरसात आणि अद्वितीय खेळाची पर्वणी लुटण्यासाठी अख्खे जग आतूर झाले आहे.
सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवून श्वास रोखून धरणाऱ्या फुटबॉलच्या या महासंग्रामाची अनुभूती पुढील महिनाभर घेता येणार आहे. भारताचा राष्ट्रीय संघ या स्पर्धेत सहभागी नसला तरी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस अशा बेधुंद वातावरणात भारतीय चाहतेही रात्र-रात्र जागवून या महासोहळ्याची पर्वणी लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीग किंवा स्पॅनिश लीग यांसारख्या युरोपियन लीगमधून चमकणारे लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार, आंद्रेस इनियेस्टा यांच्यासारखे हिरो आता आपल्यातील सर्वोत्तम खेळाचा नजराणा पेश करणार आहेत. या वेळी स्पेन पुन्हा विजेतेपदावर नाव कोरणार का ब्राझीलचे मायदेशात विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न पूर्ण होणार, नेयमारची जादू घरच्या चाहत्यांना अनुभवता येणार की जर्मनीचा संघ बाजी मारणार, अशा चर्चा आता दैनंदिन कामकाजाचा भाग होणार आहेत.
*फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच गोल-लाइन तंत्रज्ञानाचा वापर. इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या साहाय्याने चेंडूने गोलरेषा पार केली आहे की नाही, याबाबतचा अचूक निर्णय पंचांना देता येणार आहे.
*विश्वचषकाच्या इतिहासात महागडा सोहळा.
*विश्वचषकातील सर्वोत्तम १५ गोलच्या ब्राझीलच्या रोनाल्डोच्या विक्रमापासून जर्मनीचा मिरोस्लाव्ह क्लोस फक्त एका गोलने दूर.
*विश्वचषकादरम्यान ५७६ दशलक्ष अमेरिकन डॉलरची बक्षिसे. विजेत्याला ३५ दशलक्ष डॉलरचे इनाम. राष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध क्लब्सना फिफाकडून ७० दशलक्ष अमेरिकन डॉलर.
*सामन्यादरम्यान प्रेक्षकांचा गोंधळ किंवा हुल्लडबाजी रोखण्यासाठी प्रथमच रेफ्री व्हॅनिशिंग स्प्रेचा वापर.
*गेट.. सेट.. गोल..!
*ब्राझीलच दावेदार
*वमो ला सा!
*गोष्ट छोटी डोंगराएवढी!
*वुई आर वन..
*श्रीमंत रोनाल्डोपंत
विशेष सदरे
*सट्टे पे सट्टा
*ब्राझीलमधून
*कप-शप
*‘शुट’आऊट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा