रशियात २०१८मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली. जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेले जर्मनी, स्पेन, फ्रान्स, अर्जेटिना यांना पुढील फेरीत सहज प्रवेश मिळेल अशीच गटवारी मिळाली. विशेष म्हणजे जागतिक क्रमवारीत ६७व्या स्थानावर असलेल्या यजमान रशियालाही सोपा गट मिळाला. त्यामुळे गटवारी जाहीर झाल्यानंतर रशियात आनंद साजरा करण्यात आला. इतिहासावर नजर टाकल्यास युरोपियन देशांमध्ये दक्षिण अमेरिकेतील संघांना यश मिळवण्यात अपयश आलेलेच दिसून येते. ब्राझीलने १९५८मध्ये स्वीडनमध्ये झालेली स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एकदाही ब्राझील किंवा अर्जेटिनाला युरोपीय भूमीवरील स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे रशियातील या स्पर्धेत युरोपीय देशांचीच हुकूमत पाहायला मिळेल, हे निश्चित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विश्वचषक म्हटले की सध्याच्या कामगिरीवर जर्मनी आणि स्पेन हे संघ जेतेपदाच्या शर्यतीत अव्वल असायलाच हवेत. तसे ते याही वेळेला आहेत. पण, इतर विश्वचषक स्पर्धाप्रमाणे यंदा ‘ग्रूप ऑफ डेथ’ (उलटफेर करणारा गट) नसल्याने उपउपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे या स्पर्धेची खरी चुरस उपउपांत्यपूर्व फेरीतच पाहायला मिळणार आहे. स्पेन आणि पोर्तुगाल हे दोन बलाढय़ संघ एकाच गटात असल्याने साखळीतील रंजकता टिकून आहे. जर्मनीला उलटफेर निकाल नोंदवण्यात पटाईत असलेल्या मेक्सिको आणि स्वीडन या संघांचा अडथळा पार करताना थोडा संघर्ष करावा लागेल. पण, जर्मनीची घोडदौड रोखण्यात त्यांना यश मिळणे कठीण आहे. इटली, नेदरलँड, चिली, अमेरिका या चिवट संघांना पात्रता निकष फेरी गाठण्यात अपयश आल्यामुळे इतरांचा मार्ग अधिक सुकर झालेला आहे.

रशियात जूनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत वातावरणाशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान दक्षिण अमेरिकेतील संघांसमोर असणार आहे. तसेही दक्षिण अमेरिकेतून पात्र ठरलेल्या अर्जेटिना, ब्राझील, कोलंबिया, पेरू आणि उरुग्वे यांना फार मोठी झेप घेता येईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. लिओनेल मेसीवर पूर्णपणे विसंबून असलेल्या अर्जेटिनाने अखेरच्या क्षणाला विजय मिळवून रशियातील प्रवेश निश्चित केला. ब्राझीलवर भूतकाळातील जेतेपदांवर किती दिवस स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. विश्वचषक पात्रता स्पर्धेत त्यांना एकदा चिलीकडून पराभव पत्करावा लागला, तर बोलिव्हिया व पॅराग्वे या दुबळ्या संघांनी बरोबरीत रोखून ब्राझीलच्या मर्यादा उघड केल्या. ब्राझील त्या धक्क्यातून स्वत:ला सावरत असला तरी नेयमार वगळता त्यांच्याकडे दुसरे मोठे नाव नाही. १९५८साली स्वीडनमध्ये केलेला करिष्मा त्यांना रशियात दाखवता येईल, असे सध्या तरी वाटत नाही. कोलंबिया, पेरू व उरुग्वे यांच्यावर कितपत विश्वास टाकावा हा प्रश्न अनुत्तरित आहे.

युरोपियन देशांमध्ये जर्मनी आणि स्पेन हे प्रबळ दावेदार आहेत. रशियाला सोपा गट मिळाला असला तरी उपउपांत्यपूर्व फेरीपलीकडे ते मजल मारतील याची शक्यता कमी आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये गाजणारे खेळाडू इंग्लंडकडून खेळताना काहीसे कमी पडतात. त्यामुळे १९६६नंतर ते पुन्हा जेतेपद पटकावतील असे त्यांच्या बाबतीत ठामपणे सांगता येऊ शकत नाही. पोर्तुगाल आणि डेन्मार्क हे ‘डार्क हॉर्स’ ठरू शकतात. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मेसी यांच्यात नेहमी तुलना रंगते, परंतु रोनाल्डो संघाला व क्लबला जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरलेला आहे. त्याबाबतीत क्लबकडून सर्वोत्तम खेळ करणारा मेसी राष्ट्रीय संघात हरवलेला असतो. युरो २०१६मधील रोनाल्डोने संघासाठी तारणहाराची भूमिका बजावली आहे. कारकिर्दीतील अखेरच्या विश्वचषकाची सांगता तो जेतेपदाने करण्यासाठी नक्कीच उत्सुक असेल.

जेतेपदाच्या शर्यतीत युरोप आणि दक्षिण अमेरिका अशा गटांमध्ये विभागलेले प्रबळ दावेदार आपापल्या घरच्या वातावरणातच हुकूमत गाजवतानाचा इतिहास आहे. १९५८ आणि २०१४चा अपवाद वगळला तर या खंडांमधील देशांनीच विश्वचषक उंचावला आहे. या खेपेलाही हीच शक्यता आहे. फक्त जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन यांच्यात चढाओढ असेल आणि त्यात नक्की कोण बाजी मारेल हे चित्र १५ जुलैला स्पष्ट होईल.

स्वदेश घाणेकर

swadesh.ghanekar@expressindia.com