फिफा विश्वचषकातील ‘ब’ गटातील मोरक्को आणि स्पेन यांच्यातील अखेरचा सामना २-२ असा बरोबरीत राहिला. मोरक्कोकडून खालीद बोतेब आणि युसूफ यांनी तर स्पेनकडून इस्कोने गोल केला. सोमवारी झालेल्या या सामन्यात बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत पोहोचला आहे. स्पेन या गटात प्रथम स्थानी राहिला. तर मोरक्कोचा संघ याआधीच बाद फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यात जर मोरक्कोने स्पेनचा दणदणीत पराभव केला असता तर स्पेनला बाद फेरीत पोहोचणे कठीण गेले असते.
#FifaWorldCup2018: The Group B match between Spain
आंद्रेस इनिएस्ता आणि सर्गियो रामोस यांच्यात झालेल्या गैरसमजुतीचा फायदा घेत मोरक्कोने यंदाच्या विश्वचषकातील आपला पहिला गोल नोंदवला. पण स्पेनने ही आघाडी जास्त काळ टिकू दिली नाही. अनुभवी मिडफिल्डर इस्कोने गोल करण्याची मिळालेली संधी वाया घालवली नाही. त्याच्या गोलने स्पनेला बरोबरी साधता आली.
खालीद बोतेबने स्पेनच्या चुकीनंतर हाफवे लाइनवर चेंडूवर कब्जा मिळवला आणि १४ व्या मिनिटाला मोरक्कोला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. त्याने आरामात चेंडू पुढे ढकलत स्पेनचा गोलकिपर डेव्हिड डे गियाला चकवत गोल केला.
मोरक्कोने यापूर्वीचे आपले दोन्ही सामने गमावले होते. ते रशिया आणि इराणकडून पराभूत झाले होते. पण या सामन्यात त्यांनी २०१० च्या चॅम्पियन संघाविरोधात पाच मिनिटांपर्यंत आघाडी कायम ठेवली होती. पण इनिएस्ताने चेंडून इस्कोकडे सोपवला आणि त्याने तो थेट मोरक्कोच्या नेटमध्ये ढकलला.
बोतेबकडे २५ व्या मिनिटाला आणखी एक गोल करण्याची संधी आली होती. त्याने स्वत:ला ऑन साइड ठेवत एक लाँग पासला चेंडू स्पॅनिश गोलपोस्टकडे ढकलला. पण मँचेस्टर युनायटेडकडून खेळत असलेला गोलकिपरने स्वत:ला योग्य पोझिशनमध्ये ठेवत गोल वाचवला. खेळ जेव्हा ८१ व्या मिनिटाला आला तेव्हा युसूफ अन नायसिरीने गोल करून आपल्या संघाला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली.