फिफा विश्वचषकातील ‘ब’ गटातील पोर्तुगाल आणि इराण यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. पोर्तुगालने हाफ टाइमच्या काही क्षण आधी गोल केला. हा गोल रिकार्डोने केला. हा सामना बरोबरीत ठेऊन पोर्तुगाल बादफेरीत पोहोचला आहे. ते ‘ब’ गटात दुसऱ्या स्थानी राहिले. त्यांचा सामना आता ‘अ’ गटातील आघाडीचा संघ ऊरग्वेबरोबर होईल.
#FifaWorldCup2018: The group B match between Portugal
रिकार्डो पोर्तुगालचा फॉरवर्ड खेळाडू आहे. त्याने उजव्या बाजूने प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला केला. त्याने अॅड्रियन सिल्वाचा बॅकहिल पासवर किक मारत गोल पोस्टच्या एका कोपऱ्यात चेंडू ढकलला. युरोपीयन चॅम्पियनला पुढच्या फेरीत जाण्यासाठी ड्रॉची आवश्यकता होती. रिकार्डोने ४५ व्या मिनिटाला हा गोल केला. रोनाल्डोलाही गोल करण्याची संधी मिळाली. ५१ व्या मिनिटाला त्याला पेनल्टी किक मिळाली. पण इराणी गोलकिपर अलीरजाने आपल्या डाव्या बाजूला झेप घेत चेंडू अडवला.
करीम अन्सारीफार्डने स्टॉपेज टाइममध्ये गोल करून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. इराणला व्हिडिओ रिव्ह्यूनंतर पेनल्टी मिळाली. या बरोबरीनंतर पोर्तुगाल गटात दुसऱ्या स्थानी राहिला. त्यांचेही स्पेनप्रमाणे पाच गुण झाले. स्पेन आणि मोरक्कोचा सामनाही २-२ असा बरोबरात राहिला. पण गोलच्या हिशेबाने स्पेन पहिल्या स्थानी आला. स्पेनचा सामना रशियाविरूद्ध होईल. इराणी टीमने युरो कप चॅम्पियन्सला तोडीस तोड लढत दिली. इराणने ख्रिस्तियानो रोनाल्डोला पेनल्टी किकलाही गोल करण्याची संधी दिली नाही.