बुधवारी अर्जेंटिनाच्या नियतकालिक एल ग्राफिकोने सांगितले की, ७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय संघाच्या पत्रकार परिषदेदरम्यान रॉड्रिग्जने टेबलावरून मांजर फेकून दिले होते. ज्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ब्राझीलचे राष्ट्रीय पत्रकार अधिकारी विनिशियस रॉड्रिग्ज यांनी मांजरीला क्रूर वागणूक दिल्याच्या आरोप करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर स्वयंसेवी संस्थांचा एक गट आणि देशाच्या राष्ट्रीय फोरम फॉर द प्रोटेक्शन ऑफ एनिमल्सने, ब्राझिलियन फुटबॉल कॉन्फेडरेशनविरुद्ध एक मिलियन रियास ($200,000) खटला दाखल केला. म्हणजेच जवळपास १.६२ कोटींचा खटला दाखल करण्यात आला आहे.

तक्रारकर्त्यानी यावर एक मागणी केली आहे. ज्यामध्ये सार्वजनिक माफी मागावी आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना पर्यावरण संरक्षण आणि प्राण्यांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी कार्यक्रमाचा समावेश आहे. विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाकडून पराभव झाल्यानंतर, अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मांजरीला टेबलवरून फेकून देण्याच्या वाईट अपशकुन देखील जोडले होते.

फायनल अर्जेंटिना आणि फ्रान्समध्ये होणार –

गतविजेत्या फ्रान्सने उपांत्य फेरीत मोरोक्कोचा पराभव करून सलग दुस-यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तसेच तिथे त्यांचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. कतार येथे बुधवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा (फ्रान्स विरुद्ध मोरोक्को) २-० असा पराभव केला. अशाप्रकारे प्रथमच उपांत्य फेरी गाठणाऱ्या मोरोक्कन संघाचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. १८ डिसेंबर रोजी विजेतेपदाचा सामना होणार आहे.

हेही वाचा – Fifa World Cup 2022: शेवटचा विश्वचषक खेळत असलेल्या मेस्सीच्या संघाचा विजय निश्चित? ‘हे’ दोन आश्चर्यकारक योगायोग देत आहेत साक्ष

तिसऱ्या स्थानासाठी मोरोक्कन आणि क्रोएशिया संघात लढत –

एकूणच चौथ्यांदा अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यात फ्रेंच फुटबॉल संघाला यश आले. ते १९९८ आणि २०१८ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनले होते. आता तिसऱ्या स्थानासाठी मोरोक्कन संघाचा सामना १७ डिसेंबरला क्रोएशियाशी होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत क्रोएशियाला अर्जेंटिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 1point 65 crore lawsuit against the brazilian football confederation for throwing a cat by vinicius rodrguez vbm