दोहा :  कीशर फुलरने ८१व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात कोस्टा रिकाने जपानचा १-० असा पराभव केला. या पराभवाने जपानच्या बाद फेरी प्रवेशाच्या आशांना धक्का पोहचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोस्टा रिकाच्या विजयाने इ गटातून जर्मनीला निश्चित दिलासा मिळाला असेल. जर्मनीला पहिल्या सामन्यात जपानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

खेळाडूंच्या सावध पवित्र्यामुळे कंटाळवाण्या झालेल्या सामन्यात फुल्लरचा गोल निर्णायक ठरला. संपूर्ण सामन्यात गोलजाळीच्या दिशेने कोस्टा रिकाकडून मारण्यात आलेला हा पहिलाच फटका होता. जपानच्या पहिल्या सामन्यातील जर्मनीवरील ऐतिहासिक विजयाने सामन्याला मैदानात जपानी समर्थकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. मात्र, अगदी अखेरच्या टप्प्यात गोल स्वीकारावा लागल्याने जपानी चाहत्यांची निराशा झाली.

बाद फेरीच्या उद्देशाने जपान वेगवान आणि आक्रमक खेळ करेल ही अपेक्षा पहिल्या सत्रापासून फोल ठरली. सामना सुरुवातीपासून संथगतीने सुरू होता. दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी आपली भूमिका चोख बजावली. गोल करण्याचे फार काही प्रयत्न दिसलेच नाहीत.