इक्वेडोर संघाने फिफा विश्वचषक २०२२ चा पहिला सामना जिंकला आहे. अ गटात यजमान कतारविरुद्ध २-० असा विजय मिळवून दक्षिण अमेरिकन राष्ट्राने स्पर्धेतील पहिले गुण मिळवले. इक्वेडोरचा फॉरवर्ड एनर व्हॅलेन्सियाने सामन्यातील दोन्ही गोल केले. यासह कतार हा यजमान म्हणून पहिला सामना गमावणारा फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला देश ठरला आहे. स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान देशाला सलामीचा सामना गमवावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला इक्वेडोरने कतारच्या पोस्टमध्ये गोल केला, पण व्हीएआरने तो फेटाळला. यानंतर १६व्या मिनिटाला एनर व्हॅलेन्सियाने पेनल्टीद्वारे स्पर्धेतील पहिला गोल केला. ३१व्या मिनिटाला व्हॅलेन्सियाने आणखी एक गोल करून इक्वेडोरला विजय मिळवून दिला. अ गटात नेदरलँड आणि सेनेगल या संघांचाही समावेश आहे. या विजयासह इक्वेडोरला अंतिम १६ मध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे.

कतार आपला पहिला विश्वचषक खेळत असताना दुसरीकडे इक्वेडोरचा संघही विश्वचषकात फारसा जुना नाही. संघाने मागील फुटबॉल विश्वचषकासाठी प्रथमच पात्रता मिळवली आणि मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले आणि नंतर गट टप्प्यातच बाहेर पडले. २००६ च्या विश्वचषकात, संघ केवळ पात्र ठरला नाही तर गट टप्प्यात पोलंड आणि कोस्टा रिकासारख्या संघांना पराभूत करून बाद फेरीत प्रवेश केला. विश्वचषकाच्या इतिहासात इक्वेडोरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यानंतर इंग्लंडकडून १-० ने पराभूत झाल्यानंतर इक्वेडोरला राऊंड ऑफ १६ मधून बाहेर केले.

२०१२ साली संघ पुन्हा एकदा विश्वचषकासाठी पात्र ठरला. त्यानंतर संघ आपल्या गटात तिसरा क्रमांक मिळवला आणि पुढे प्रगती करू शकला नाही. २०१८ मध्ये, इक्वेडोरने विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी गमावली आणि आता संघ पुन्हा एकदा विश्वचषक खेळत आहे.

हेहा वाचा – विश्वचषकाची ऐतिहासिक सुरुवात; सलामीच्या लढतीत इक्वेडोरची यजमान कतारवर सरशी

सोमवारी या स्पर्धेत तीन सामने खेळवले जाणार आहेत. ब गटातील पहिला सामना इंग्लंड आणि इराण यांच्यात होईल, तर दुसरा सामना अ गटातील सेनेगल आणि नेदरलँड्स यांच्यात होईल, तर तिसरा सामना ब गटातील अमेरिका आणि वेल्स यांच्यात होईल.