अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यातील विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांची नियुक्ती झाल्यामुळे वादग्रस्त वादग्रस्त पंच माटेयू लाहोज यांना कतारमधून मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. वादग्रस्त पंच माटेयू लाहोज यांना सोमवारी कतारहून घरी पाठवण्यात आले असून ते फिफा विश्वचषक २०२२ च्या उर्वरित चार सामन्यांमधून त्यांना वगळण्यात आले आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सवर अर्जेंटिनाच्या पेनल्टीवर विजय मिळविल्यानंतर लाहोज चर्चेत आला होता, जिथे खेळाडू आणि चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला या रेफरीबद्दल विशेष बोलायचे नाही. पण मी हे  निश्चित सांगू शकतो की फिफाने यावर थोडा अधिक विचार करायला हवा. जो आपले काम नीट करू शकत नाही त्याने अशा खेळाचा पंच म्हणून काम करू नये. किंबहुना एवढ्या मोठ्या विश्वचषकाच्या मंचावर पंच म्हणून काम करण्याची पात्रता नाही त्याला फिफाने संधी तरी का द्यावी.” अशा शब्दात सामना संपल्यावर लिओनेल मेस्सीने आपली उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ब्रिटीश मीडिया मेल ऑनलाइननुसार, मेस्सीवर नाराज असलेल्या अँटोनियो माटेयू लाहोज (अँटोनियो माटेयू लाहोज) नावाच्या वादग्रस्त पंचांना फिफाने घरी पाठवले आहे.

हेही वाचा: पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा वादग्रस्त विधान, भारतीय क्रिकेटला कोहलीच्या १०० किंवा २०० शतकांची गरज नाही

लिओनेल मेस्सी आणि त्याचा संघ विरोधी खेळाडूंशी कधीही गैरवर्तन किंवा आक्रमकपणे बोलत नाही. भूतकाळात अनेक सामने गमावल्यानंतर तो खाली मान घालून मैदान सोडतो किंवा बाहेर पडतो. पण यावेळी त्याचा राग हा अनावर झालेला सर्वानीच पाहिला. पंचांचे वागणे त्याला असह्य झाले आणि त्याने सर्व भडास ही मैदानात काढलेली दिसली. उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी नेदरलँड्सविरुद्ध टायब्रेकरमध्ये दमदार कामगिरी करत सामना जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या कर्णधाराने पंच लाहोजला फटकारले. त्यामुळे मेस्सीच्या विधानाचे समर्थन करत जागतिक फुटबॉलच्या सर्वोच्च प्रशासकीय समितीने पंचांची हकालपट्टी केली. ब्रिटीश मीडिया मेल ऑनलाइनने हा दावा केला आहे.

हेही वाचा: “युवराज सिंग सर्वोत्तम व्हाईट बॉल क्रिकेटपटू…”असे विधान करणाऱ्या गौतम गंभीरला सोशल मीडियावर केले ट्रोल

स्पॅनिश पंचांनी सामन्यादरम्यान लिओनेल मेस्सीच्या एका कार्डसह दोन्ही संघांना १६ पिवळी कार्डे दिली. त्यानंतर पंच आणि खेळाडू यांमध्ये थोडी चकमक पाहायला मिळाली. एकावेळी तर ते आपापसात भिडतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अत्यंत तीव्र अशा स्वरूपाचे संभाषण त्यांच्यात सुरु होते कारण त्यात अनेक चुकीचे निर्णय होते. १७ पिवळ्या कार्डांमध्ये मेस्सीचा समावेश होता. मार्कोस अनुकिया आणि गोन्झालो मॉन्ट्रियल हे स्पर्धेतील दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यामुळे उपांत्य फेरीत खेळू शकणार नाहीत. दुसरीकडे, रेफ्रींनी नेदरलँड्सच्या संघाला आठ कार्डे दाखवली. लाहोजने डेन्झेल डमफ्रीजलाही दोनदा यलो कार्ड दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 fifa shows 17 yellow card referees out after messis complaint avw