दोहा : लुसेल स्टेडियमवर झालेला अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक झाला. अर्जेटिनाकडे ८०व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी होती. मात्र, यानंतर किलियन एम्बापेने आपली गुणवत्ता सिद्ध करताना ९७ सेकंदांत दोन गोल करत फ्रान्सला बरोबरी करून दिली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत मेसी आणि एम्बापेने प्रत्येकी एकेक गोल केल्याने सामना ३-३ असा बरोबरीत आला. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट झाले. यात मेसी, पाव्लो डिबाला, लिआंड्रो पेरेडेस, गोन्झालो मोन्टिएल यांनी गोल करत अर्जेटिनाला विजय मिळवून दिला.  

अंतिम सामन्याची अर्जेटिनाने आक्रमक सुरुवात केली. भक्कम बचाव, मध्यरक्षकांचे चेंडूवर नियंत्रण आणि आक्रमकांचा तेजतर्रार खेळ यामुळे अर्जेटिनाने पूर्वार्धात फ्रान्सवर वर्चस्व गाजवले. गेले दोन सामने संघाबाहेर बसलेल्या अ‍ॅन्जेल डी मारियाला अंतिम सामन्यात सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. २१व्या मिनिटाला फ्रान्सच्या ओस्मान डेम्बेलेने डी मारियाला गोलकक्षात अयोग्यरित्या पाडल्याने अर्जेटिनाला पेनल्टी मिळाली. यावर मेसीने गोल करत अर्जेटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मेसीचा हा यंदाच्या विश्वचषकातील एकूण सहावा आणि पेनल्टीच्या साहाय्याने केलेला चौथा गोल ठरला. यानंतर अर्जेटिनाने सांघिक कामगिरीच्या जोरावर ३६व्या मिनिटाला २-० अशी आघाडी मिळवली. फ्रान्सचा बचावपटू डायोट उपामेकानोकडून चेंडू मिळवल्यानंतर मेसीने अलेक्सिस मॅक अ‍ॅलिस्टरकडे पास दिला. अ‍ॅलिस्टरने उजवीकडून चेंडू पुढे नेत फ्रान्सच्या गोलकक्षात आक्रमण केले. मग त्याने डावीकडून पुढे धावत आलेल्या डी मारियाकडे चेंडू दिला आणि डी मारियाने चेंडूला गोलची दिशा देत अर्जेटिनाची आघाडी भक्कम केली. मग फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर डेशॉम्प यांनी प्रमुख आघाडीपटू ऑलिव्हिएर जिरूड आणि डेम्बेले यांच्या जागी रँडल कोलो मुआनी आणि मार्कस थुराम या युवकांना मैदानावर उतरवले. त्यामुळे फ्रान्सच्या खेळात अधिक उर्जा संचारली.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी

नियमित वेळेतील अखेरच्या १० मिनिटांत सामन्याचे पारडे फ्रान्सच्या बाजूने झुकले. ७९व्या मिनिटाला कोलो मुआनीला अर्जेटिनाचा अनुभवी बचावपटू निकोलस ओटामेन्डीने अयोग्यरित्या पाडल्याने फ्रान्सला पेनल्टी मिळाली. एम्बापेने यावर गोल करत अर्जेटिनाची आघाडी कमी केली. ९७ सेकंदांनंतरच एम्बापेने अप्रतिम फटका मारून वैयक्तिक आणि फ्रान्सला दुसरा गोल केला.

FIFA World Cup Final: गतविजेत्यांना दे धक्का! मेस्सीचे स्वप्न साकार करत अर्जेंटिनाने कोरले विश्वचषकावर नाव

अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांमध्ये जिंकण्याची जिद्द दिसून आली. पहिल्या सत्रात गोल होऊ शकला नाही. दुसऱ्या सत्रात मात्र १०८ व्या मिनिटाला मेसीने गोल करून अर्जेटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेपर्यंत राखून अर्जेटिना विजय साकारणार असे वाटत असतानाच ११८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली. यावर एम्बापेने गोल नोंदवत फ्रान्सला बरोबरी साधून दिली.

अर्जेटिनाचा कर्णधार आणि फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अखेर साकार झाले. रविवारी झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर ४-२ अशी सरशी साधताना अर्जेटिनाने तिसऱ्यांदा विश्वविजेते म्हणून मिरवण्याचा मान मिळवला.

Fifa World Cup 2022 Final: एकाच विश्वचषकात प्रत्येक फेरीत ‘ही’ कामगिरी करणारा मेस्सी ठरला एकमेव खेळाडू

अर्जेटिनाचे हे तिसरे विश्वविजेतेपद ठरले. त्यांनी १९७८ व १९८६मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणारा एम्बापे केवळ दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी इंग्लंडच्या जेफ हस्र्ट यांनी १९६६ मध्ये पश्चिम जर्मनीविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

सर्वाधिक विश्वचषक जिंकणारे संघ

ब्राझील :       ५ (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२)

जर्मनी :        ४ (१९५४, १९७४, १९९०, २०१४)

इटली :        ४ (१९३४, १९३८, १९८२, २००६)

अर्जेटिना :     ३ (१९७८, १९८६, २०२२)

गोल्डन बूट (सर्वाधिक गोल)

किलियन एम्बापे (फ्रान्स) :        ८

लिओनेल मेसी (अर्जेटिना) :      ७

ज्युलियन अल्वारेझ (अर्जेटिना) :  ४

ऑलिव्हिएर जिरूड (फ्रान्स) :      ४

पेनल्टी शूटआऊट

    फ्रान्स                   अर्जेटिना            

किलियन एम्बापे ✓   (१-१)   लिओनेल मेसी   ✓

किंग्सले कोमान  ✘    (१-२)   पाव्लो डिबाला    ✓

टिचोआमेनी     ✘   (१-३)   लिआंड्रो पेरेडेस    ✓

कोलो मुआनी    ✓   (२-४)   गोन्झालो मोन्टिएल ✓

Story img Loader