कतारमध्ये खेळला जाणारा फिफा विश्वचषक आता शेवटच्या दिशेने सरकला असून आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरू होईल. हा सामना सुरू होण्यापूर्वी फिफातर्फे समारोप समारंभ आयोजित केला जाणार आहे. हे भव्यदिव्य असणार असून त्यात अनेक मोठे कलाकार सहभागी होणार आहेत. भारताकडून दिलबर गर्ल नोरा फतेही परफॉर्म करणार आहे.
नोरा फतेही व्यतिरिक्त हे स्टार्स परफॉर्म करणार आहेत
ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना भिडणार आहेत. आजचा हा अंतिम सामना जोरदार आणि रोमांचक असेल यात दुमत नाही. कारण या सामन्यात कायलिन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारखे खेळाडू झुंजताना दिसणार आहेत. यात विशेष म्हणजे अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभही होणार आहे. दिमाखदार स्पर्धेसोबतच या समारोप सोहळ्याचीही सर्वांना प्रतीक्षा आहे. भारतीय अभिनेत्री आणि स्टार डान्सर नोरा फतेही समारोप समारंभात परफॉर्म करणार आहे. नोरा व्यतिरिक्त, समारोप समारंभास उपस्थित राहण्याची पुष्टी केलेल्या इतर कलाकारांमध्ये पोर्तो रिकन गायक ओझुना आणि कांगोली-फ्रेंच रॅपर गिम्स यांचा समावेश आहे. याशिवाय, जेनिफर लोपेझ आणि शकीरा यांना विश्वचषक फायनलसाठी एका म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दाखवण्याची अपेक्षा आहे.
भारतीय अभिनेत्री नोरा फतेही या कार्यक्रमात परफॉर्म करणार असल्याचे निश्चित झाले आहे. तसेच, नायजेरियन-अमेरिकन संगीतकार डेव्हिडो देखील कार्यक्रमात वर्ल्ड कप २०२२ थीम सॉन्ग (हया-हया) सादर करणार आहे. पोर्तो रिकन सिगार ओझुना आणि काँगोलीज-फ्रेंच रॅपर गिम्स यांनीही समारोप समारंभास उपस्थित राहण्याची पुष्टी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर लोपेझ आणि शकीरा वर्ल्ड कप फायनलसाठी एका म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसणार आहेत.
भारतीय वेळेनुसार समारोप समारंभ कधी सुरू होईल?
फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी लुसाइल स्टेडियमवर समारोप समारंभ होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. संपूर्ण कार्यक्रमाचा कालावधी सुमारे अर्धा तास अपेक्षित आहे.
तुम्ही भारतात मोफत लाइव्ह पाहू शकता
फिफा विश्वचषक २०२२ चा समारोप समारंभ स्पोर्ट्स १८ चॅनलवर भारतात थेट पाहता येईल. तुम्ही तो तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर Jio Cinema अॅप किंवा वेबसाइटवर मोफत पाहू शकता. या सोहळ्यानंतर या सामन्याचे प्रक्षेपणही येथे होणार आहे.